घरमुंबईभरकटलेल्या समाजाला संतांचे विचारच तारू शकतील

भरकटलेल्या समाजाला संतांचे विचारच तारू शकतील

Subscribe

आज समाजामध्ये व्यसनाधीनता आणि चंगळवादामुळे समाज भरकटत चाललेला आहे. अशा परिस्थितीत या समाजाला संतांचे विचारच तारू शकतात. संतांनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास समाजाची उन्नती निश्‍चितपणे होईल, असे विचार समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडले आहेत.

आज समाजामध्ये व्यसनाधीनता आणि चंगळवादामुळे समाज भरकटत चाललेला आहे. अशा परिस्थितीत या समाजाला संतांचे विचारच तारू शकतात. संतांनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास समाजाची उन्नती निश्‍चितपणे होईल, असे विचार समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडले आहेत. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या ७२२ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कार्तिकी एकादशीच्या दिवशी संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या नावाने जगातील सर्वात मोठा घुमट उभारणार्‍या कारागिरांना ‘संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली सेवा समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ समाजसेवक अण्णा हजारे व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी ‘संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली सेवा समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ गोविंद अलेटी, विष्णू भिसे, छगनलाल सुतार आणि कृष्णा पवार यांना प्रदान करण्यात आला. तसेच, ‘संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली सेवा पुरस्कार’ दिलीप पाटील, शिवाजी गोरे, राजाराम घुगे, श्रीनिवास मंगळुरी, विकास तांबट, दिलीप रोहम, दत्तात्रय माने व साईनाथ कानपुरे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बालयोगी सदानंद महाराज, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, राज्याचे माजी वन मंत्री बबनराव पाचपुते, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड व ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर हे उपस्थित होते.

- Advertisement -

पाणी अडवा, पाणी जिरवा – अण्णा

अण्णा हजारे म्हणाले की , शुध्द आचार, शुध्द विचार, निष्कलंक जीवन, त्यागाची भावना आणि अपमान पचविण्याची सवय अंगी असली पाहिजे. तसेच, हा देह समाजासाठी आहे, हे तत्व सदैव आपल्या मनात रूजविल्यास संपूर्ण विश्‍वात परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यावर मात करावयाची असेल, तर प्रत्येक गावाने पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना राबविली पाहिजे. संतांच्या एका ओवीने सुध्दा समाज परिवर्तन होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राळेगण सिद्धी हे गाव होय. यापुढे अण्णा म्हणाले की, आम्ही विज्ञानाच्या आधारेच चंद्रापर्यंत व अंतरिक्षात प्रवेश केला. पण अध्यात्माच्या आधारे अद्याप अंतरंगात पोहोचलेलो नाही. जो पर्यंत आम्ही अध्यात्माची कास धरणार नाही, तो पर्यंत हे विज्ञान आम्हाला विनाशाच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळेच अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संतश्री ज्ञानेश्‍वर माऊलीच्या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती करणार्‍या कारागिरांचे नाव संपूर्ण जगात अजराअमर होणार आहे. त्यांनी उभारलेली ही वास्तू चिरंतन राहणार आहे, असेही अण्णा म्हणाले.


हेही वाचा – लोकपालसाठी अण्णा हजारे पुन्हा बसणार उपोषणाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -