घरमहाराष्ट्रशारदीय नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची विक्रमी गर्दी; 23 लाखांचा टप्पा केला...

शारदीय नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची विक्रमी गर्दी; 23 लाखांचा टप्पा केला पार

Subscribe

दरम्यान देवस्थान समितीकडून अंबाबाईच्या दर्शनाची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सोया करण्यात आली होती. ऑनलाईन माध्यमातून सुद्धा ४२ लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. तर सप्तमीलासुद्धा अंबाबाई मंदिरामध्ये देवस्थान समितीकडून 7 लाख 73 हजार 721 भाविकांनी दर्शन घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच सण – उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते पण यावर्षी मात्र कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तानी या वर्षी गर्दीचे सर्व नियम मोडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या दर्शनासाठी 32 लाख 31 हजार 604 भाविकांनी गर्दी केली.

हे ही वाचा – दोन्ही नेत्यांसाठी आज खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन; शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

- Advertisement -

दरम्यान देवस्थान समितीकडून अंबाबाईच्या दर्शनाची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सोया करण्यात आली होती. ऑनलाईन माध्यमातून सुद्धा 42 लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. तर सप्तमीलासुद्धा अंबाबाई मंदिरामध्ये देवस्थान समितीकडून 7 लाख 73 हजार 721 भाविकांनी दर्शन घेतल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या कड्यावरून मत मतांतरे सुद्धा आहेत. कारण तीन लाखांवर भाविक गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली 12 ठिकाणची पार्किंग व्यवस्थासुद्धा कोलमडली होती. शहरातील वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला. त्यामुळे या आकडेवारीबाबत साशंकता आहे. सोबतच नवरात्रीच्या दिवसांमध्ये 13 लाख प्रसादाच्या लाडूंची विक्री झाली.

हे ही वाचा – पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर समर्थकांचा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

- Advertisement -

कोल्हापूरच्या अंबाबाईची नवरात्रोत्सवात पुढील स्वरूपात पूजा करण्यात आली.

1) पहिल्या माळेला अंबाबाईची सिंहासनारूढ या रूपात पूजा करण्यात आली.

2) द्वितीय माळेला अंबाबाईची दुर्गा देवीच्या रुपात पूजा करण्यात आली.

3) तृतीय माळेला अंबाबाईची सिद्धीदेवी रुपातील अलंकार पूजा करण्यात आली.

4) चौथ्या माळेला अंबाबाईची मदुराई निवासिनी मीनाक्षीच्या रुपात अलंकार पूजा करण्यात आली.

5) ललिता पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा करण्यात आली.

6) सहाव्या माळेला अंबाबाईची भक्ती मुक्ती प्रदायिनीच्या रुपात पूजा करण्यात आली.

7) सप्तमी तिथीला अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रूपात पूजा करण्यात आली.

8) अष्टमी तिथीला महिषासुरमर्दिनी रुपात पूजा करण्यात आली.

9) नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा करण्यात आली.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -