घरमहाराष्ट्रदोन्ही नेत्यांसाठी आज खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन; शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

दोन्ही नेत्यांसाठी आज खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन; शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबईत जे दोन मेळावे होणार आहेत त्यात दोन्ही नेते आज खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन असणार आहे. या मेळाव्यातून ते जनतेच्या मनाला, प्रश्नांना हात घालतील, अशी अपेक्षा आहे.'

दसऱ्या दिवशी राज्यात तीन ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. याच तीन मेळाव्यांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सर्वत्र तीच चर्चा सुद्धा आहे. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर दोन गट पडले. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन मेळावे होणार आहेत.तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा होत आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईत होणाऱ्या दोन्ही दसरा मेळाव्यांवर भाष्य केलं आहे.

हे ही वाचा – अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचंही पाठबळ

- Advertisement -

ठाकरे घराण्यातील व्यक्तींबरोबर तुमचं कौटुंबिक नाते राहिलेलं आहे, पण यावर्षी शिवसेनेचे दोन मेळावे होणार आहेत. दोघांपैकी तुम्ही कोणाचं भाषण ऐकणार आहात आणि तुमच्या मते खरी शिवसेना कोणाची? माध्यमांकडून जहाज प्रश्न विचारण्यात आल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘या सगळ्या गोष्टींकडे मी कुतूहलातून पहाते आहे. कारण मी या सगळ्यातून गेले आहे. मी एका मेळाव्याचं सीमोल्लंघन करून दुसऱ्या मेळाव्यासाठी दुसरं स्थान निर्माण केलं आहे. मुंबईत जे दोन मेळावे होणार आहेत त्यात दोन्ही नेते आज खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन असणार आहे. या मेळाव्यातून ते जनतेच्या मनाला, प्रश्नांना हात घालतील, अशी अपेक्षा आहे.’

हे ही वाचा –  एकनाथ शिंदेंकडे दसरा मेळाव्यासाठी ‘ते’ 10 कोटी आले कुठून? सुषमा अंधारेंचा थेट सवाल

- Advertisement -

दरम्यान मुंबईत होत असलेल्या दोन्ही दसऱ्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला असून पंकजा मुंडे यांनी आपला दसरा मेळावा हा अत्यंत सध्या सोप्या पद्धतीने होणार असल्याचं म्हणाल्या. ‘मुंबईमधील दोन्ही दसरा मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सगळ्यांचं लक्ष या मेळाव्यांकडे लागून राहिलं आहे. सगळ्या माध्यमांचंही लक्षही या मेळाव्यांकडे लागून राहिलं आहे. त्यामुळे मी दोन्ही मेळाव्यांना शुभेच्छा देते. मात्र या दोन्ही मेळाव्यांपेक्षा एकदम वेगळा मेळावा आपला असणार आहे. कारण आपल्या मेळाव्यात खुर्च्या मांडलेल्या नाहीत, कुठलीही व्यवस्था नाही. डोंगर-कपारीत काहीही व्यवस्था नसताना होत असलेला माझा हा मेळावा आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा – अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचंही पाठबळ

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -