घरदेश-विदेशएचआयव्ही बाधित महिलेने तलावात उडी घेतल्याने तलाव केला रिकामा

एचआयव्ही बाधित महिलेने तलावात उडी घेतल्याने तलाव केला रिकामा

Subscribe

एचआयव्ही बाधित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण तलाव रिकामी करण्यात आला आहे.

पुण्यातील एका महिलेला एचआयव्ही बाधित म्हणून नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. कर्नाटकमध्ये एचआयव्ही बाधित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने त्या तलावातील पाणी पिण्यास गावातील लोकांनी नकार दिला आहे. तसेच हा संपूर्ण तलाव रिकामी करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

कर्नाटकमधील एका तलाव एचआयव्ही बाधित महिलेने २९ नोव्हेंबर रोजी उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील हुबळीपासून सुमारे २० किमी दूर मोराब गावात ही घटना घडली आहे. मोराब गावात राहणारी एचआयव्ही बाधित महिलेने तलावात उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. मात्र त्यानंतर गावातील लोकांनी त्या तलावाचे पाणी पिण्यास नकार दिला आहे. प्रशासनान लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. अखेर हा संपूर्ण तलाव रिकामा करुन पुन्हा मलप्रभा कालव्यातून पाणी सोडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत ४० टक्के पाणी बाहेर काढण्यात आले असून अजून ६० टक्के पाणी बाहेर काढायचे असून त्याला ५ दिवस लागणार आहेत.

- Advertisement -

वाचा – संजय गांधी निराधार योजनेतून ४०० एचआयव्ही बाधितांना फायदा


ग्रामस्थ मलप्रभा कालव्यातून पाणी आणतात

उत्तर कर्नाटकातील नावलगुंड तालुक्यातील मोराब तलाव हा सर्वांत मोठ्या तलाव असून हा पाणी पिण्याचा एकमेव स्त्रोत आहे. या तलाव्यात पाणी असताना देखील आता मोराब गावातील ग्रामस्थ सध्या ३ किमी अंतरावरील मलप्रभा कालव्यातून पाणी आणत आहेत. प्रशासनाने मोराब तलावातील पाण्याचे सेवन केले तरी देखील ग्रामस्थ ऐकण्यास तयार नाहीत. अखेर प्रशासनाने २० सायफन ट्यूब्स आणि पाण्याच्या चार मोटारीमनी तलाव रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र येत्या ८ डिसेंबर रोजी कालवा बंद होणार आहे. त्यामुळे ६ डिसेंबरपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे काम होईल. तलाव भरायला वेळ लागणार असून नावलगुंडचे तहसीलदार हल्लूर यांनी मलप्रभा कालव्यातून तलाव भरण्यासाठी२० डिसेंबर मुदत वाढ मागितली आहे.

- Advertisement -

एचआयव्ही पाण्याने पसरत नाही, हे ग्रामस्थांना सांगितले. परंतु ते ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे आता हा तलाव रिकामा करण्याची वेळ आली आहे.  – डॉ. राजेंद्र दोड्डामनी, आरोग्य अधिकारी


वाचा – नोकरीवरुन हाकललं; मात्र पुन्हा बोलावलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -