घरमहाराष्ट्रबाबो! अनिल परबांचा ६ कोटींचा रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटीचा खर्च

बाबो! अनिल परबांचा ६ कोटींचा रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटीचा खर्च

Subscribe

सहा ते सात कोटी रुपयांत बांधलेल्या या दोन्ही रिसॉर्ट्सला पाडण्यासाठी तब्बल १ कोटींचा खर्च येणार असल्याचं आज खुद्द भाजपा नेते किरीट सोमय्यांनी म्हटलंय. आज त्यांनी त्याबाबत ट्विटच केलंय.

मुंबई – किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडीकडे सादर केले होते. मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020मध्ये दापोलीत तीनमजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. आता दापोली साई रिसॉर्ट एनएक्स आणि सी कोच रिसॉर्ट (Dapoli Sai Resort NX & Sea Coach Resort) येत्या काही काळात पाडण्यात येणार आहे. मात्र, सहा ते सात कोटी रुपयांत बांधलेल्या या दोन्ही रिसॉर्ट्सला पाडण्यासाठी तब्बल १ कोटींचा खर्च येणार असल्याचं आज खुद्द भाजपा नेते किरीट सोमय्यांनी म्हटलंय. आज त्यांनी त्याबाबत ट्विटच केलंय.

हेही वाचा – सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला – अनिल परब

- Advertisement -

१,०१,२५००० रुपये रत्नागिरी जिल्हाधिकारी बँक खात्यात आज महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाने पाठवले आहेत. अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी हे पैसे पाठवण्यात आले आहेत. येत्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) पाडकामाला सुरुवात होईल, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.


या रिसॉर्टचे बांधकाम मार्च २०१७ मध्ये सुरू झाले होते. सहा कोटींपेक्षा जास्त पैसे रोख रक्कमेत हे रिसॉर्ट बांधकामासाठी देण्यात आले आहेत, असा अहवाल सीबीडीटीने मार्च २०२२ मध्ये सादर केला होता. म्हणजेच, सहा कोटींच्या रिसॉर्टसाठी एक कोटींचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलला आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे पैसे कशाच्या अखत्यारित दिले याचे पुरावे द्यावे, अशी मागणी केली जातेय. तसंच, या पैशांची वसुली कशी करणार असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. सामान्य नागरिकांनी भरलेले टॅक्स पाडकामासाठी वापरण्यात येणार आहेत का असा संताप व्यक्त केला जातोय.

- Advertisement -

रिसॉर्टचे बांधकाम पाडण्यासाठी जवळपास साडेचार कोटी रुपये खर्च येणार असून तो अनि परब यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार, आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात पाडकामासाठी १ कोटींपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे, ही रक्कम महाराष्ट्र सरकार अनिल परब यांच्याकडून वसून करणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -