घरपालघरऑनलाईन भरणा केंद्र अनेक महिन्यांपासून बंद

ऑनलाईन भरणा केंद्र अनेक महिन्यांपासून बंद

Subscribe

नगरपरिषदेने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असताना नगरपरिषद दरवेळेस थातूरमातूर उत्तर देते असा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.

पालघर : पालघर शहरातील नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास सोपे जावे म्हणून ऑनलाईन पद्धतीने या करांचा भरणा करण्यात यावा असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून ही सुविधा बंद असल्याने नागरिकांना व विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची फार गैरसोय होत असून नगरपरिषद याकडे लक्ष देईल का असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. पालघर नगरपरिषदेचे कार्यालय पालघर शहरापासून साधारण दोन किलोमीटर लांब आहे. तिथे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरण्यासाठी सर्वसामान्यांना जायचे असल्यास खासगी वाहन अथवा भाड्याच्या रिक्षाने जावे लागते. त्यासाठी ७० ते ८० रुपयांचा भुर्दंड त्यांना पडत आहे. त्याहीपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास प्रचंड प्रमाणात सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असताना नगरपरिषद दरवेळेस थातूरमातूर उत्तर देते असा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.

www.palgharmc.org या वेबसाईट द्वारे मालमत्ता कर व पाणीपट्टी भरता येते. मात्र अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या या वेबसाईटबद्दल विचारणा केली असता तीन महिन्यांपासून एकाच प्रकारचे उत्तर ऐकायला मिळत आहे. दरवेळेस लवकरच सुरू होईल असे उत्तर ऐकून नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर त्यांना ऑनलाईन भरणा करता येत नाही. त्यासाठी त्यांना सुट्टी घ्यावी लागते.
बहुसंख्य पालघरवासी कामानिमित्त रोज मुंबई अथवा आजूबाजूच्या शहरांमध्ये जात असतात. त्यामुळे ऑनलाईन भरणा केंद्र सुरू झाल्यास चाकरमान्यांची व्यवस्था होणार आहे. ही भरणा केंद्रे रविवारी सुद्धा काही तासापर्यंत सुरू ठेवावीत जेणेकरून त्याचा फायदा नगरपरिषदेस होणार आहे. यासाठी नगरपरिषदेने विशेष लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांना त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी ही नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुख्याधिकार्‍यांकडे विचारले की, लवकर करू असे आश्वासन देतात. पण पुढे काहीच करत नाहीत असाही आरोप नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -