घरमनोरंजनसलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अडगळीच्या ठिकाणी सापडल्या डेंग्यूच्या अळ्या

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अडगळीच्या ठिकाणी सापडल्या डेंग्यूच्या अळ्या

Subscribe

किटक नाशक विभागाच्या पथकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर ठिकाणी कीटकनाशक औषधांची फवारणी केली आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अभिनेता सलमान खान (actor salman khan ) याला डेंग्यूची लागण झाली होती. अश्या बातम्या माध्यमातून समोर आल्या त्यामुळेच त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग देखील रद्द करण्यात आले आहे. अशातच आता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पालिकेच्या कीटकनाशक पथकाला अडगळ असलेल्या दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. मात्र किटक नाशक विभागाच्या पथकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर ठिकाणी कीटकनाशक औषधांची फवारणी केली आहे.

दरम्यान यासंदर्भातील माहिती किटक नाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांच्याकडून देण्यात आली आहे. सलमान खान यांना डेंग्यूची लागण झाल्याची चर्चा कानावर आल्यानंतर पालिकेच्या कीटकनाशक पथकाने त्यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये व परिसरात अशा 308 ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अडगळीच्या दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.

- Advertisement -

तसेच, सदर परिसरातही काही ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे कीटकनाशक विभागाने सदर ठिकाणी कीटकनाशक फवारणी करून डेंग्यूच्या आळ्या नष्ट केल्या आहेत. डेंग्यू पसरविणा-या ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या आळ्यांची पैदास मुख्यत्वे स्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे सलमान खान राहत असलेल्या संपूर्ण इमारतीत पालिकेच्या किटकनाशक विभागाच्या वतीने डासांची पैदास स्थाने नष्ट करण्यात आली. मात्र दोन ठिकाणी ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या अळ्या आढळून आल्या होत्या. पालिकेच्या कीटकनाशके विभागाच्या पथकाने सदर परिसरात धुराचीफवारणी व कीटकनाशके फवारणीही केली आहे.

या चित्रपटांमध्ये देखील दिसणार सलमान खान
‘गॉडफादर’ चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान ‘Tiger 3’ चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल. या व्यतिरिक्त तो शाहरूखच्या ‘पठाण’ चित्रपटात देखील दिसेल.

- Advertisement -

हे ही वाचा – Salman Khan ने सेलिब्रेट केला वडिल सलीम खान यांचा ८६वा वाढदिवस 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -