घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीने जर सरकार पाडलं नसतं तर.., पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

राष्ट्रवादीने जर सरकार पाडलं नसतं तर.., पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

Subscribe

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार ढासळलं आहे. मविआ सरकारमध्ये सुद्धा काँग्रेसकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादीने जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं, असा टोला काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर लगावला आहे.

पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. २०१४ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार चांगलं काम करत होतं. परंतु सरकारवर टीका करत राष्ट्रवादी सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादीने जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं. मात्र तसं न झाल्याचा भाजपला फायदा झाला, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

राज्यात भाजपचं सरकार सत्तेत येण्यास कोण कारणीभूत आहे, हे सगळ्यांना समजलं. काँग्रेसमध्ये २२ वर्षांनंतर अंतर्गत निवडणुका झाल्या. आम्ही तशी मागणी लावून धरली नसती, तर कदाचित या निवडणुका आत्ताही झाल्या नसत्या, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


हेही वाचा : पेडणेकरांच्या एसआरए घोटाळ्यावर सोमय्या अॅक्शन मोडमध्ये, म्हणाले…

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -