घरमहाराष्ट्रपेडणेकरांच्या एसआरए घोटाळ्यावर सोमय्या अॅक्शन मोडमध्ये, म्हणाले...

पेडणेकरांच्या एसआरए घोटाळ्यावर सोमय्या अॅक्शन मोडमध्ये, म्हणाले…

Subscribe

वरळीतील एसआरए प्रकरणावरून आता मुंबईच्या माजी महापौर, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्यांनी पेडणेकरांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्यांनी कोणत्याही चौकशीला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

किरीट सोमय्यांनी आज सकाळी एक ट्विट केले होते, ज्यात त्यांनी लिहिले होते की, किशोरी पेडणेकरांना आज पुन्हा दादर पोलिस स्टेशनमध्ये यावे लागणार. दादर पोलिस स्टेशनमध्ये १२ एसआरए फ्लॅट्सच्या विक्री प्रकरणी चौकशी सुरु आहे. किश कार्पोरेट कंपनीविरुद्ध मरीन लाईन पोलिस स्टेशनमध्येही चौकशी सुरु आहे. या कंपनीला बीएमसीचं कोविडमध्ये कंत्राट मिळालं होतं. आपली यासंदर्भातील याचिका असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.

- Advertisement -

याप्रकरणारवर प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले की, दबावतंत्र तर उद्धव ठाकरे वापरत होते, आमची सत्ता नव्हती त्याकाळात दाबून ठेवलेले सत्य आता बाहेर येत आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे भरलेले एफिडेविटही दाखवले. यावर त्यांचे गाळे असल्याचा आरोप होतो तिथला पत्ता असल्याचेही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

सोमय्या पुढे म्हणाले की, शिंदे फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, उद्धव ठाकरे यांचा महानगरपालिकेतला घोटाळा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल. त्याचबरोबर पेडणेकरांनी चौकशीला सामोरं जावं. ही चौकशी म्हणजे कोणतं दबाव तंत्र नाही. किशोरी पेडणेकर या कोविडला कमाईचं साधन बनवणाऱ्या महापौर आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

एक तर तोंड बंद करा नाहीतर…; एसआरए घोटाळ्यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर संतापल्या


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -