घरमनोरंजनसमांथा रूथ प्रभुने आपल्या आरोग्याबद्दल केला महत्वपूर्ण खुलासा

समांथा रूथ प्रभुने आपल्या आरोग्याबद्दल केला महत्वपूर्ण खुलासा

Subscribe

समंथाबद्दल बोलायचे झालं तर, तिची अफाट लोकप्रियता, तिचं काम, आणि तिच्या आत्मविश्वासमुळे चर्चेत असणाऱ्या समंथाने तिच्या सोशल मीडियावर एक धाडसी पोस्ट शेअर केली.

समंथाबद्दल बोलायचे झालं तर, तिची अफाट लोकप्रियता, तिचं काम, आणि तिच्या आत्मविश्वासमुळे चर्चेत असणाऱ्या समंथाने तिच्या सोशल मीडियावर एक धाडसी पोस्ट शेअर केली.

कॅप्शनमध्ये समंथाने लिहिले, “यशोधा ट्रेलरला तुमचा जबरदस्त प्रतिसाद होता. मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेले हे प्रेम आणि कनेक्शन आहे, ज्याने मला आयुष्यात येणाऱ्या अनंत आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून कंडीशनचे निदान झाले. ते सुधारल्यानंतर मी ते सामायिक करण्यास उत्सुक होती. पण माझ्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागत आहे. मला हळुहळू हे लक्षात येत आहे की आपल्याला नेहमीच आपली बाजू भक्कम ठेवण्याची गरज नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

- Advertisement -

ही अगतिकता स्वीकारणे ही अशी गोष्ट आहे ज्याचा मी अजूनही संघर्ष करीत आहे. मी लवकरच पूर्ण बरी होईन असा डॉक्टरांना विश्वास आहे. माझे चांगले आणि वाईट दिवस होते…शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या…आणि जेव्हा असे वाटते की मी त्याचा दुसरा दिवस हाताळू शकत नाही, तो क्षण कसा तरी निघून जातो. माझा वाटते की याचा अर्थ असा होऊ शकतो की मी बारी होण्याच्या आणखी एक दिवस जवळ आहे. आय लूव्ह यू.. हे पण निघून जाईल”

वर्कफ्रंटवर, समंथा तिच्या आगामी बहुभाषिक चित्रपट ‘यशोधा’सह प्रेक्षकांना पुन्हा भेटायला तयार आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला सर्व भाषांमध्ये प्रचंड प्रेम मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – “तुला लग्नाशिवाय मूल झाल्यास मला काही अडचण नाही”; जया बच्चन नाती नव्या नवेलीला म्हणाल्या…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -