घरताज्या घडामोडीदक्षिण कोरियाच्या हॅलोवीन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; मृतांची संख्या १४९वर

दक्षिण कोरियाच्या हॅलोवीन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; मृतांची संख्या १४९वर

Subscribe

दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवल या कार्यकमात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या चेंगराचेंगरीत 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला असून, 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवल या कार्यकमात चेंगराचेंगरीl 149 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या चेंगराचेंगरीत 50 जणांना हृदयविकाराचा झटका होता. तर, या घटनेत 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (South Korea Halloween Festival Many Peoples Suffer From Heart Attack Died video viral)


मिळालेल्या माहितीनुसार, सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवलमध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी या पार्टीमध्ये सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर अचानक या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

नेमकी घटना कशी घडली ?

  • दक्षिण कोरियातील सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले होते.
  • त्या कार्यक्रमात एका ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता.
  • सेल्फी पॉईंटजवळी सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
  • या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाले.
  • या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • 50 जणांना हार्ट अटॅक आला आहे.

याशिवाय, या दुर्घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी शर्तीच्या प्रयत्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने बऱ्याच लोकांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हृदयविकाराचा धक्का बसण्यासारख्या समस्या निर्माण झाल्या. या जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक मोठी गर्दी जमल्यामुळे चक्कर येऊन पडत असल्याचे दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सियोलच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक हॅलोवीन फेस्टिवल साजरा करण्यासाठी जमले होते.


हेही वाचा – दोन महिला वकिलांची एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण; ‘यूपी’च्या कौटुंबिक न्यायालयातील व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -