घरट्रेंडिंगदोन महिला वकिलांची एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण; 'यूपी'च्या कौटुंबिक न्यायालयातील व्हिडीओ व्हायरल

दोन महिला वकिलांची एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण; ‘यूपी’च्या कौटुंबिक न्यायालयातील व्हिडीओ व्हायरल

Subscribe

कौटुंबिक न्यायालयात दोन महिला वकीलांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. उत्तरप्रदेशच्या कासगंजमधील कौटुंबिक न्यायालयात दोन महिला वकिलांमध्ये छोट्या-मोठ्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

कौटुंबिक न्यायालयात दोन महिला वकीलांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. उत्तरप्रदेशच्या कासगंजमधील कौटुंबिक न्यायालयात दोन महिला वकिलांमध्ये छोट्या-मोठ्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी एकमेकींच्या जीवावर उठल्याचे समजते. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Uttar Pradesh two ledy advocate fight in family court video viral on social media)

या व्हायरल व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. महिला वकिलांना भांडताना पाहून सर्वच जण हैराण झाले. त्यावेळी उपस्थित महिला कॉन्स्टेबलसह अनेकांनी मध्यस्थी करून हे भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण दोघीही ऐकत नसून, त्यांनी एकमेकींना बेदम मारहाण केली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, योग्यता सक्सेना आणि सुनीता कौशिक अशी या दोन महिला वकिलांची नावे आहेत. त्या कासगंज आणि अलीगडच्या रहिवासी आहेत. राहुल बोस आणि पारूल सक्सेना पती-पत्नी आहेत. राहुल आणि पारूल या दोघांना न्यायलयाने तारीख दिली होती. त्यावेळी न्यायालयात दाखल झाल्यावर दोन वकिलांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला. दोन्ही महिला वकिलांनी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.


हेही वाचा – बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये मिळणारा व्हायरल मेसेज खोटा; केंद्र सरकारची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -