घरपालघरकर थकवणार्‍यांची नावे पालिका चव्हाट्यावर आणणार

कर थकवणार्‍यांची नावे पालिका चव्हाट्यावर आणणार

Subscribe

त्याचबरोबर शहरात कर भरणा तातडीने करण्याबाबत जनजागृती करण्याकामी प्रत्येक प्रभागात स्पीकर व भोंग्याचा वापर करून रिक्षा फिरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील सर्व सोसायटीमधील ज्या नागरिकांनी कर भरणा केला नाही आहे. त्या सोसायटीमध्ये किंवा सोसायटी परिसरात ये – जा करणार्‍या नागरिकांच्या नजरेत येईल, अशा ठिकाणी त्यांच्या नावाचे, मालमत्ता क्रमांकाचे होर्डिंग्ज लावून अशा कर भरणा न करणार्‍या नागरिकांना महापालिकेमार्फत प्रसिद्धी देण्याचे निर्देश आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्व कर निरीक्षक यांना दिले आहेत. त्याचबरोबर शहरात कर भरणा तातडीने करण्याबाबत जनजागृती करण्याकामी प्रत्येक प्रभागात स्पीकर व भोंग्याचा वापर करून रिक्षा फिरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मिरा -भाईंदर शहरामधील बर्‍याचश्या मालमत्ता धारकांकडे वर्षानुवर्षे थकबाकी असून मालमत्ता कर वसुलीवरती याचा नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी कर वसुलीचा वेग वाढवण्याकरता आवश्यक ते निर्देश एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात बैठकीत मालमत्ता कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्याचे महापालिका आयुक्त ढोले यांनी निर्देश दिले. याबैठकीला अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (कर विभाग) संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त (कर) सुदाम गोडसे, सिस्टम मॅनेजर राजकुमार घरत, सहाय्यक आयुक्त, कर निरीक्षक, कर वसुली लिपिक उपस्थित होते. मोठे थकबाकीदार असलेली कर वसुली लवकरात लवकर कशी होईल व महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्या या अनुषंगाने ही आढावा बैठक घेण्यात आली.

- Advertisement -

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत मिरा भाईंदर महापालिका कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर 100 कोटी 33 लाख 6 हजार 539 इतका जमा करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत दिनांक 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत 103 कोटी 47 लाख 16 हजार 763 इतकी कर वसुली करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 1 लाख 25 हजार 37 नागरिकांनी 62 कोटी 40 लाख 51 हजार 992 इतका ऑफलाईन कर भरणा केला आहे. तर 87 हजार 585 नागरिकांनी एकूण 41 कोटी 06 लाख 64 हजार 771 इतका ऑनलाईन पद्धतीने कर भरणा केला आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर लवकरात लवकर भरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शहरातील विकासकामे, नागरिकांना महापालिका तर्फे उपलब्ध होणार्‍या सुविधा यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये. त्याकरता सर्व नागरिकांनी ऑनलाईन सुविधा MyMBMC अ‍ॅप किंवा www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन वेळेत कर भरणा करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -