घरपालघरपालघरमध्ये नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा युट्युबवर थेट प्रसारण करण्याची मागणी

पालघरमध्ये नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा युट्युबवर थेट प्रसारण करण्याची मागणी

Subscribe

त्यामुळे सभेत बसावयास उत्साह वाटत नाही व मन मेटाकुटीला येते. सभा ही चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आहे, पण येथे नेहमी प्रत्येक सभेत भांडणे होताना दिसतात.

पालघर:  पालघर नगरपरिषदेत होणारी सर्वसाधारण सभा युट्युबवर थेट प्रसारण करण्याची मागणी पालघर नगरपरिषदेच्या एका नगरसेविकांनी नगराध्यक्षा यांना निवेदनामार्फत केली आहे. नगरपरिषदेतील सर्वसाधारण व विशेष सभेचे कामकाज हे पालघरकर जनतेला युट्युबवर थेट प्रसारण द्वारे दाखवण्यात यावा, जेणेकरून जनतेला याद्वारे जनतेनी पालघर नगरपरिषदेत निवडून पाठवलेल्या लोकप्रतिनिधीची कार्यक्षमता पहायला मिळेल. तसेच, जर पालघर नगरपरिषद याबाबत खर्च करण्यास सक्षम नसल्याने स्वखर्चाने ते एका वर्षाच्या युट्युब थेट प्रसारण करण्यास तयार आहेत. पालघर नगरपालिकेच्या नगरसेविका प्रियंका म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही नगरसेवक व नगरसेविका सभाशास्त्रानुसार चालत नसून काही सभाशास्त्र विरुद्ध वागताना दिसतात. त्यामुळे सभेत बसावयास उत्साह वाटत नाही व मन मेटाकुटीला येते. सभा ही चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आहे, पण येथे नेहमी प्रत्येक सभेत भांडणे होताना दिसतात. म्हणून माझी अशी विनंती आहे की नगरपरिषदेच्या विशेष व सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे थेट प्रसारण युट्युबवर करण्यात यावे. यासाठी नगरपरिषदेची आर्थिक क्षमता नसल्यास १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या संपूर्ण वर्षभराचा खर्च मी स्वतः करण्यास तयार असल्याबाबत ही त्यांनी तयारी असल्याचे नगरपालिकेला सुचवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -