घरमहाराष्ट्रराऊतांच्या जामीनाबद्दल राष्ट्रवादीला आनंद, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'हे लढवय्ये नेते'

राऊतांच्या जामीनाबद्दल राष्ट्रवादीला आनंद, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘हे लढवय्ये नेते’

Subscribe

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत, प्रविण राऊत यांना अखेर सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान राऊतांना जामीन मिळताच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत राऊत हे लढवय्ये नेते आहेत म्हणत कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सत्यमेळ जयते म्हणत राऊत खऱ्या अर्थाने वाघ असल्याचे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

नवाब मलिक, अनिल देशमुख किंवा संजय राऊत हे लढवय्ये नेते आहेत. महाराष्ट्राचे, देशाचे लढवय्ये नेते आहेत. संघर्ष हा प्रत्येकाला आयुष्यात करावा लागतो पण तो वेगवेगळ्या पद्धतीने असतो. तिघांना ज्यापद्धतीने अटक झाली, हे दुर्दैवी आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबावर अडचण येते तेव्हा त्यांची बायको, मुलं, जवळचा मित्र परिवार हा एका भावनिक संघर्षातून जात असतो. हे भुजबळांपासून मी अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळे न्यायप्रक्रियेवर आमचा विश्वास होता आणि आज कोर्टाने आम्हाला न्याय दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्व कोर्टांचे मनःपूर्वक आभार मानले.

- Advertisement -

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

सत्यमेव जयते, शेवटी आपण जो मुद्दा मांडतो तो योग्य असेल तर कोर्ट त्याला गृहित धरून त्याबाबत निर्णय देतो आणि आज राऊतांच्या बाजूने जामीनाच्याबाबतीत दिला आहे. राऊतांनी कोणालाही न घाबरता कोणतीही भूमिका परखडपणे मांडली आहे. जेव्हा ईडी, सीबीआयने त्यांच्यावर कारवाई केली तेव्हा त्यांना जेलमध्ये जाव लागलं, त्यावेळीही त्यांनी सत्याच्या बाजूने भूमिका घेत, जो काही अन्याय त्यांच्यावर झाला त्याविरोधात त्यांनी परखड भूमिका घेतली. म्हणून आज जो व्हिडीओ मी टाकला तो खऱ्या वाघाचा आहे. आणि तीच भूमिका आज संजय राऊतांना बेल मिळाल्यानंतर वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.


हेही वाचा : वाघाला फार काळ कोंडून ठेऊ शकला नाहीत; राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारेंना आनंदाश्रू अनावर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -