घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील प्रदूषणात वाढ, मुंबईत दिल्लीपेक्षाही हवेचा खराब स्तर

महाराष्ट्रातील प्रदूषणात वाढ, मुंबईत दिल्लीपेक्षाही हवेचा खराब स्तर

Subscribe

महाराष्ट्रात वाहनांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या वाढत्या प्रदूषणासाठी उद्योग, वाहनांतून निघाणारा धूर, बांधकाम जबाबदार आहे. राज्यातील एयरोसोल प्रदूषणातही वाढ झाली आहे. दिल्लीत खराब हवेची गुणवत्ता सुधारत असताना आता मुंबईत हवेची गुणवत्ता अतिशय बिघडली आहे. मुंबईत हवेचा स्तर दिल्लीहून अधिक बिघडला आहे.

मुंबईत तीन ठिकाणी हवेचा अतिशय खराब स्तर आढळला आहे. हवेचा स्तर अर्थात एअर क्वालिटी इंडेक्स ३०१ ते ४०० दरम्यान होता. मालाडमध्ये सर्वात खराब हवेचा स्तर आढळून आला आहे. या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स ३२१ होता. माजगावमध्ये ३१६, बोरिवलीमध्ये ३०३ आणि अंधेरीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स २२८ इतका नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईतील हवेची स्थिती पाहता शहरात सर्वांनी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मास्क लावल्यामुळे प्रदूषणाचे कण शरीरात जाण्यापासून रोखता येऊ शकतात. शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे कण उडतात. तसेच वाहनांमधून निघणारा धूर नागरिकांना अधिक धोकादायक ठरू शकतो.


हेही वाचा : आदिवासींच्या रस्त्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम; जनजातीय आयोगाचाही विचार : मुख्यमंत्री शिंदे

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -