घरट्रेंडिंगशिमल्यात वाढतेय माकडांची दादागिरी; 75 हजार रुपयांची पळवली बॅग

शिमल्यात वाढतेय माकडांची दादागिरी; 75 हजार रुपयांची पळवली बॅग

Subscribe

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील लोक सध्या तिथल्या उपद्रवी माकडांमुळे हैराण झाले आहेत. यांपैकी एका माकडाने तर तब्बल 75 हजार रुपयांच्या नोटा असलेली बॅग पळवून नेली आहे. इतकंच नव्हे तर, त्या माकडाने त्या नोटा बॅगेतून काढून फाडल्या देखील आणि उरलेल्या चार-पाच हजाराच्या नोटा त्याने इकडे तिकडे फेकून दिल्या. माकडाचा हा गोंधळ चालू असताना आजू-बाजूला उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शिमल्यातील मॉल रोडवरील एका कार्यालयात एक व्यक्ती बिल जमा करण्यासाठी आला होता, त्यानंतर त्याला बँकमध्ये दुकानाचे पैसे करायचे होते. मात्र, त्यावेळी अचानक माकडाने त्या माणसाच्या हातातील बॅग खेचून घेतली.

त्यानंतर त्या माकडाने बॅग खेचून एका गच्चीवर उडी मारली. माकडाला पाहून लोकांची गर्दी जमा झाली. यादरम्यान, लोकांनी माकडाकडून बॅग परत घेण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने बॅगेतून पैसे काढून उडवायला सुरुवात केली. यातील काही पैसे त्याने उडवल्यावर खाली पडले. तसेच यातील काही नोटा त्याने फाडल्या. थोड्या वेळाने ते माकड बॅग तिथेच ठेवून पळून गेलं, त्यानंतर ती बॅग तिथल्या लोकांना सर्व नोटा एकत्र केल्या. या वेळी 75 हजारांमधील फक्त 70 हजार मिळाले. मात्र, 4 हजार रुपये मिळाले नाही. हे पैसे त्याने फाडले होते.

- Advertisement -

शिमल्यात वाढतेय माकडांची दादागिरी
शिमल्यात माकड तिथे आलेल्या पर्टकांची पर्स, कॅप, बॉग, खाद्यपदार्थ, चष्मा हिसकावून घेत असतात.

 

- Advertisement -

हेही वाचा :

श्रद्धाचे मुंडकेच सापडेना, आफताब करतोय पोलिसांची दिशाभूल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -