घरताज्या घडामोडीशिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन

शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून संपूर्ण राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील सावरकर पुतळ्याजवळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांचा डमी आणत त्यांना उठाबश्या काढायला लावल्या. तसंच या डमीचं धोतर फेडत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं.

- Advertisement -

हा महाराष्ट्र कालही छत्रपतींचा होता आजही छत्रपतींचा आहे आणि उद्याही छत्रपतींचा राहील. मात्र भाजपची लाचारी पत्करलेल्या मुख्यमंत्र्यांना सावरकरांचा अपमान दिसतो. पण छत्रपतींच्या अपमानावर ते सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी टीका यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. यानंतर राज्यपालांवर जोरदार टीका होत आहे. आज ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.


हेही वाचा : छत्रपती शिवरायांवरील वादावर फडणवीस स्पष्टचं म्हणाले, ‘राज्यापालांच्या वक्तव्याचा विपर्यास’


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -