घरदेश-विदेशअल कायदाने भारतात उभारले जिहादचे नवे मॉड्यूल; तपास यंत्रणांकडून अलर्ट जारी

अल कायदाने भारतात उभारले जिहादचे नवे मॉड्यूल; तपास यंत्रणांकडून अलर्ट जारी

Subscribe

अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारताविरोधात नव्या जिहादचा मॉड्यूल रचण्याची तयारी केली आहे. यात तरुणांना जोडण्यासाठी अल कायदाशी संबंधित संघटना इस्लामिक ट्रान्सलेशन सेंटरने (आयटीसी) नवा प्लॅन आखला आहे. आयटीसीच्या वेब पोर्टलने मुस्लीम तरुणांना जिहादी मीडियामध्ये सामील होण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर आता गुप्तचर यंत्रणा तसेच पोलिस आणि इतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

गृहमंत्रालयाच्या माहितीनंतर बिहार पोलिसांच्या विशेष शाखेने सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. विशेष शाखेने पाठवलेल्या अलर्टमध्ये आयटीसी वेब पोर्टलने शेअर केलेल्या पोस्टचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मुस्लीम तरुण आणि महिलांना जिहादी मीडियामध्ये सहभागी होण्याचे करण्यात आले आहे.

- Advertisement -

आयटीसीच्या वेब पोर्टलने मुस्लीम तरुणांसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, उत्तम संधी, प्रिय मुस्लीम बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जिहादी मीडियाच्या कामात रस आहे का? आम्हाला भाषांतरकारांची गरज आहे, तुम्ही कोणत्याही भाषेत काम करु शकता. या मुजाहिद उलेमा आणि उमरस यांच्या लेखांचा अनुवाद करण्यासाठी आमच्या मोहिमेत सामील व्हा. जिहादी माध्यमांमध्ये सेवा करण्याची ही उत्तम संधी आहे. तुमच्या आजूबाजूच्या बंधू- भगिनींनाही या कामाचा फायदा करुन घ्या.

सुत्रांच्या माहितीनुसार, अल कायद्याला भारतात आपले नेटवर्क पसरवण्यासाठी ट्रान्सलेटरच्या नावाने लोकांना जोडायचे आहे. या हेतूने ही पोस्ट आयटीसी वेब पोर्टलसाठी शेअर करण्यात आली आहे. एकदा दहशतावादी नेटवर्क स्थापित झाल्यानंतर अल कायदा भारताविरुद्ध जिहाद सुरु करण्यासाठी आवाहन करु शकते. दहशतवादी संघटनेचा हा डाव लक्षात येताच सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यासोबत यावर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, धार्मिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना वेगवेगळ्या देशांमध्ये आपले जाळे पसरवण्या प्रयत्न करत आहेत. यावरून दोघांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. आयएसच्या या मोहिमेत पुढे गेल्यावर अल कायदाही आपली मोडस ऑपरेंडी स्वीकारून इस्लामिक ट्रान्सलेशन सेंटरच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.


सावरकर वाद : राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली; पृथ्वीराज चव्हाणांचे परखड मत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -