घरताज्या घडामोडीसावरकर वाद : राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली; पृथ्वीराज चव्हाणांचे परखड...

सावरकर वाद : राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली; पृथ्वीराज चव्हाणांचे परखड मत

Subscribe

भारत जोडो यात्रेत कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण तापले असून, विरोधकांनी आंदोलन करत त्यांचा निषेध केला.

भारत जोडो यात्रेत कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण तापले असून, विरोधकांनी आंदोलन करत त्यांचा निषेध केला. अशातच माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करतानाच, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केवळ एकच बाजू मांडल्याचे परखड मत व्यक्त केले.

काँग्रेसमधील बंडखोर गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जी -२३मधील नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण ओळखले जातात. भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, “सावरकरांवरील राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपाने राजकारण केले. पुरावे देत राहुल गांधींनी विधान केले. तो विषय तिथे संपला. काळ्या पाण्याची शिक्षा हजारोंना झाली होती. काळ्या पाण्याची शिक्षा वाईट होती. ती सावरकरांना झाली होती. सावरकर क्रांतीवीर होते. चांगले लेखक, कवी होते. त्या व्यक्तीचे मूल्यमापन करणारा तुलनात्मक घेतले पाहिजे. राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली. पुरावे दाखवले. त्यावरून वाद निर्माण झाला. ऐतिहासिक पुरुषांकडे पाहताना सर्व दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे”, अशा शब्दात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर स्पष्ट भूमिका मांडली.

- Advertisement -

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारताच्या १८५७ च्या युद्धाबद्दल एक भूमिका मांडली होती. ते शिपयांचे बंड नव्हते तर स्वातंत्र्ययुद्ध होते असे पुस्तक लिहिले होते. त्यावेळी इंग्रजांनी सावरकरांवर खटला दाखल केला. त्यानंतर पॅरिसमधून त्यांना अटक केली. मग त्यांना भारतात आणताना जहाजातून समुद्रात उडी मारली, हे खरंय. स्वातंत्र्यवीर हे क्रांतिकारक आणि लेखक होते. त्यांच्या सगळ्या मतांवर सहमत होऊ शकत नाही. मात्र वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर सावरकरांनी १० वर्ष शिक्षा भोगली. त्यानुसार, वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

सावरकरांबाबात सांगताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, “कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती. १० वर्षानंतर त्यांची मानसिकता मोडली. तिथून पुढे दुसरा टप्पा सुरू होतो. आणखी ४० वर्ष जेलमध्ये राहायचं म्हणून त्यांनी मला माफ करा, माझी चूक झाली. मी मदत करेन अशी पत्र लिहिली. ते माफीवीर होते असं राहुल गांधींनी म्हटले ते पुरावे दाखवले”

- Advertisement -

शिवाय, “सावरकर हे क्रांतीवीर होते तर माझे मत होते, इंदिरा गांधी यांनी १९६६ साली सावरकरांवर स्टॅम्प काढला होता. परंतु, जर सावरकर देशद्रोही असते तर इंदिरा गांधींना इतिहास माहिती नव्हता का? सावरकर गेले तेव्हाही इंदिरा गांधींनी पत्र लिहिले होते. १० वर्ष जेलमध्ये भोगून सावरकरांना ब्रिटीशांनी सोडले. त्यानंतर ते रत्नागिरीत राहत होते. इंग्रजांकडून मानधन मिळत होते. हिंदू धर्मातील विकृतीवर त्यांनी चांगली भूमिका मांडली. गाय उपयोगी पशु आहे. मांसाहाराचा पुरस्कारही केला. लिखाणात वेगवेगळ्या गोष्टी आहे”, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधींचे कान टोचले.


हेही वाचा – केंद्राने ‘हे सॅंपल’ परत न्यावं अन्यथा महाराष्ट्र बंद; राज्यपालांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -