घरताज्या घडामोडी'त्या' तरुणीच्या हत्येप्रकरणी ५ कोटी ३० लाखांचे बक्षीस असलेल्या आरोपीला अटक

‘त्या’ तरुणीच्या हत्येप्रकरणी ५ कोटी ३० लाखांचे बक्षीस असलेल्या आरोपीला अटक

Subscribe

एका २४ वर्षीय तरुणीची हत्या करत ऑस्ट्रेलियातून पळ काढलेल्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजविंद्र सिंग (३८) असे या आरोपीचे नाव असून, तोह्या कॉर्डिंग (२४) असे त्या तरुणीचे नाव आहे. राजविंद्रने २०१८मध्ये क्विन्सलॅण्डच्या सुमद्रकिनाऱ्यावर तोह्या कॉर्डिंगची हत्या केली होती.

एका २४ वर्षीय तरुणीची हत्या करत ऑस्ट्रेलियातून पळ काढलेल्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजविंद्र सिंग (३८) असे या आरोपीचे नाव असून, तोह्या कॉर्डिंग (२४) असे त्या तरुणीचे नाव आहे. राजविंद्रने २०१८मध्ये क्विन्सलॅण्डच्या सुमद्रकिनाऱ्यावर तोह्या कॉर्डिंगची हत्या केली होती. तिच्या हत्येनंतर राजविंद्रने ऑस्ट्रेलियातून पळ काढला होता. अखेर ४ वर्षानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. राजविंद्र हा मुळचा पंजाबमधील अमृतसर येथील बट्टर कालन येथील रहिवाशी आहे. (new delhi city rajwinder singh accused of killing australian woman in queensland in 2018 arresyed by delhi police)

मिळालेल्या माहितीनुसार, तोह्या कॉर्डिंगले नावाच्या २४ वर्षीय तरुणीची राजविंद्रने २१ ऑक्टोबर २०१८ रोजी हत्या केली होती. क्विन्सलॅण्डमधील वँगेटी समुद्रकिनाऱ्यावर तोह्या तिच्या कुत्र्याबरोबर वॉकसाठी आलेली आलेली असताना राजविंद्रने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तोह्या कॉर्डिंगच्या हत्येनंतर आरोपी राजविंद्रने ऑस्ट्रेलियातून पळ काढला. त्यानंतर तो दोन दिवसांमध्ये भारतात परतला होता. मागील चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होते अखेर दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आले आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी राजविंद्र सिंग या ३८ वर्षीय इसमाला अटक केली आहे. तीन आठवड्यांपूर्वी क्विन्सलॅण्ड पोलिसांनी राजविंद्रला शोधून देणाऱ्यास एक मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं (म्हणजेच जवळजवळ ५ कोटी ३० लाख रुपयांचे) बक्षीस जाहीर केले होते. हे बक्षिस जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांमध्येच राजविंद्रला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही आरोपीसाठी क्विन्सलॅण्ड पोलिसांनी जाहीर केलेल्या बक्षिसांपैकी हे सर्वात मोठे बक्षिस ठरले.

दरम्यान, राजविंद्र अमृतसर विमानतळावर आला होता. त्याला कामासंदर्भातील अडचणींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने तो आला होता अशी माहिती त्याने आपल्याला दिल्याचे त्याच्या भावाने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं. राजविंद्रने ऑस्ट्रेलियात असा काही गुन्हा केला आहे याची आपल्याला कल्पना नव्हती असंही त्याने म्हटलं आहे. भारत सरकारने यापूर्वीच राजविंद्रला ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी करणाऱ्यांचे नाना पटोले, थोरातांनी पत्राद्वारे मानले आभार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -