घरमनोरंजनराजकीय अजेंड्यासाठी द काश्मीर फाइल्सचा वापर; पल्लवी जोशींची खंत

राजकीय अजेंड्यासाठी द काश्मीर फाइल्सचा वापर; पल्लवी जोशींची खंत

Subscribe

या चित्रपटातून द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे अशी टीका सुद्धा करण्यात आली. दरम्यान या चित्रपटावरून आता नवा वादंग निर्माण झाला आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिस वर सुद्धा या चित्रपटाने मोठा गल्ला जमविला. पण या चित्रपटावरून मोठ्या प्रमाणावर वादंग सुद्धा निर्माण झाला हा वाद अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. तर पल्लवी जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र या चित्रपटातून द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे अशी टीका सुद्धा करण्यात आली. दरम्यान या चित्रपटावरून आता नवा वादंग निर्माण झाला आहे.

गोव्यात सुरू असलेल्या ५३ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इस्त्रायली चित्रपट निर्माते आणि या महोत्सवातील ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी या सिनेमावर टीका केली आणि पुन्हा वादंग निर्माण झाला. त्यांनी या सिनेमाला ‘अश्लिल आणि प्रपोगंडा’ असे म्हटले आहे. त्यांच्या या टिप्पणीवर अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, चिन्मय मांडलेकर कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. अशातच या चित्रपटाची निर्माती, अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सुद्धा या संदर्भांत एक निवेदन जारी केले आहे.

- Advertisement -

पल्लवी जोशी यांनी या निवेदनात म्हटले आहे की, ‘काश्मिरी पंडित समाज अनेक दशकांपासून ज्या यातना भोगत होता त्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय आतापर्यंत मौन बाळगून होता. ३ दशकांनंतर भारतीय चित्रपट इंडस्ट्रीला शेवटी कळले की भारताची कहाणी खरेपणाने आणि वस्तुनिष्ठपणे सांगण्याची गरज आहे.’

‘विवेक आणि मला हे नेहमीच माहीत होते की असे काही घटक आहेत ज्यांना पडद्यावर कटू सत्य पाहायला आवडणार नाही, पण काश्मीरबद्दल जुने, खोटे आणि विकृत कथन टिकवून ठेवण्याच्या राजकीय अजेंड्यासाठी हे सर्जनशील व्यासपीठ वापरले गेले हे खूप दुर्दैवी आहे. नरसंहार नाकारणाऱ्याच्या उद्धट आणि असभ्य विधानांविरुद्ध द कश्मीर फाइल्सचा बचाव करण्यासाठी भारतातील लोक ज्याप्रकारे उभे राहिले ते पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. मी आमच्या प्रेक्षक आणि समर्थकांना खात्री देऊ इच्छिते की ‘द कश्मीर फाइल्स’ हा नेहमीच लोकांचा चित्रपट राहील.’

- Advertisement -

दरम्यान पल्लवी जोशी यांनी इस्रायलच्या राजदुतांचे आभार मानले आहेत. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘मला इस्रायलचे राजदूत एच. ई. नाओर गिलॉन आणि कॉन्सुल जनरल श्री कोब्बी शोशानी यांचेही त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानायचे आहेत. मी बुद्ध आहे हाच भारताचा अर्थ आहे. मूळ भारतीय आशयासह अर्थपूर्ण सिनेमा बनवत राहण्यासाठी आम्ही सत्याच्या मार्गावर चालत राहू- पल्लवी जोशी, निर्माता, मी बुद्ध आहे’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallavi Joshi (@pallavijoshiofficial)

पल्लवी जोशी यांनी ही पोस्ट करताना नदाव लॅपिड यांचे नाव लिहित पोस्टला कॅप्शन दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘नदाव लॅपिड यांच्यासाठी हे माझे अधिकृत स्टेटमेंट आहे. जय हिंद’. या पोस्टवर त्यांच्या समर्थनार्थ अनेक कमेंट्स येत आहेत, तर काही जणांनी नदाव यांचे म्हणणे बरोबर असल्याचे म्हटले आहे.


हे ही वाचा – सत्य नेहमी कटू असतं…, नदव लॅपिडच्या वादग्रस्त वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -