घरमनोरंजन‘दृश्यम 2’ने केला 150 कोटींचा टप्पा पार; तर 'भेडिया'ने कमावले केवळ इतके कोटी

‘दृश्यम 2’ने केला 150 कोटींचा टप्पा पार; तर ‘भेडिया’ने कमावले केवळ इतके कोटी

Subscribe

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ आणि अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ चांगलाच चर्चेत आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करण्यास सुरुवात केली आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मात्र, ‘दृश्यम 2’ च्या कमाई भेडिया चित्रपटाला देखील मागे टाकत आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमावला करोडोंचा गल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109)

- Advertisement -

श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 103.50 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या शुक्रवारी 7.75 कोटींची कमाई केली. तर शनिवारी 14 आणि रविवारी 17.50 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या सोमवारी 5.50 कोटींची कमाई केली. तर प्रदर्शनाच्या 13 व्या दिवशी या चित्रपटाने 4.90 कोटींची कमाई केली दरम्यान, आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 159.39 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहून निर्माते देखील खूप खूश आहेत.

‘भेडिया’ने कमावले इतके कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

- Advertisement -

वरुण धवनचा ‘भेडिया’ सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 7.25 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 9.25 कोटींचा टप्पा पार केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 11 कोटी तर चौथ्या दिवशी 3.50 कोटींची कमाई होती. तर प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3.2 कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 40 कोटींची कमाई केली.

 


हेही वाचा :

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाला ईडीचे समन्स

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -