घरट्रेंडिंगमेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला एका अद्भुत धबधब्याचा व्हिडीओ

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला एका अद्भुत धबधब्याचा व्हिडीओ

Subscribe

भारतामधील सर्वच राज्यांचे स्वतःचे असे खास वैशिष्टय आहे. प्रत्येक राज्याची वेगळी ओळखं, वेगळं सौंदर्य आहे. यामध्ये हिमच्छादित डोंगर, जंगल, शेत, नदी, समुद्र, झरे, वाळवंट यांसारख्या एकापेक्षा एक उत्तम दृष्य आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान, असाच एक सुंदर धबधब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

मेघालयला प्रत्येकवर्षी जगभरातील अनेक पर्यटनप्रेमी भेट देतात. या राज्याच्या सुंदरतेची तुलना स्वर्गाशी केली जाते. अनेकदा सोशल मीडियावर मेघालयमधील सुंदर दृष्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जयंतिया हिल्सच्या वरुन जाताना या सुंदर धबधब्याचा एक शॉट मिळाला. हा कोणता धबधबा आहे काही अंदाज आहे का?” व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओच्या चारही बाजूला झाडं-झुडपं आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Conrad Sangma (@conrad_k_sangma)

- Advertisement -

या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करु लागले आहेत. पूर्वोत्तर राज्य, मेघालयला ढगांचे घर देखील म्हटले जाते. या सुंदर पर्वतीय राज्याची देवदार वनस्पती, झरे, रहस्यमयी गुहा अत्यंत सुंदर आहे.

 

- Advertisement -

 


हेही वाचा : 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -