घरक्रीडा'सिक्सर किंग' युवराज सिंगचा आज ३७ वा वाढदिवस

‘सिक्सर किंग’ युवराज सिंगचा आज ३७ वा वाढदिवस

Subscribe

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आज ३७ वर्षांचा झाला. त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आज ३७ वर्षांचा झाला. युवराज हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश लाभले नाही. पण एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अप्रतिम होती. त्याने ३०४ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. ज्यात त्याने ३६.५४ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या. ज्यात १४ शतकांचाही समावेश होता. त्याने भारताने जिंकलेल्या २००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ वर्ल्ड कपमध्ये तुफान प्रदर्शन केले होते. २००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात ६ षटकार लगावले होते हे कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही. तसेच २०११ वर्ल्ड कपमध्ये त्याला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड कपनंतरच त्याला कॅन्सर झाला असल्याचे कळले होते. पण त्याने जिद्दीने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.


त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -