घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट

समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट

Subscribe

नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. या महामार्गातील नागपूर ते शिर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या या मार्गावर आता एसटी महामंडळाची बस धावणार आहे.

मुंबई : नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. या महामार्गातील नागपूर ते शिर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या या मार्गावर आता एसटी महामंडळाची बस धावणार आहे. ही बससेवा नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. (MSRTC st run on samruddhi highway nagpur to shirdi aurangabad nagpur bus service starts from today)

प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाकडून १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवाशांना २X१ पध्दतीची ३० आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने (Sleeper) आहेत. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे.

- Advertisement -

या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार आहे. या बरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे.

ही बससेवा नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे. या बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच, नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.


हेही वाचा – तवांग संघर्षानंतर वायुसेनेचा सीमेवर युद्धसराव; सुखोई, राफेल जेटचा 48 तास पॉवर शो

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -