घरपालघररोहयो मजूर चाललेत कुठे ?

रोहयो मजूर चाललेत कुठे ?

Subscribe

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही येथील रोहयो मजूर शेतीची अल्प कामे आटोपून पिके खळ्यावर जमा करून शेकडो मजूर मजुरीसाठी निघाले आहेत.

ज्ञानेश्वर पालवे,मोखाडा : शेतीची अल्प कामे आटोपल्यानंतर जव्हार तालुक्याच्या ठिकाणी कामे मिळत नसल्याने, शेकडो मजूर, हाताला मिळेल ते काम करण्यासाठी डोक्यावर बोचके घेवून मजुरीसाठी बाहेर गावी आणि शहराच्या ठिकाणी निघतांना दिसत असून, स्थलांतर मजुरांची गर्दी जव्हारच्या बस स्थानकात पहायला मिळत आहे.
जव्हार हा ९२ % टक्के ग्रामीण आदिवासी तालुका असून, येथील नागरिकांची रोजगार ही मुख्य समस्या बनली आहे. मुंबईपासून १५० कि.मी. अंतरावर पालघर जिल्ह्यातील पेसा कायद्यात लागू असलेला जव्हार तालुका आहे.

या तालुक्यात १ लाख ५५ हजार लोकसंख्या आहे. या तालुक्यात जॉबकार्डधारक मजुरांची संख्या एकूण ८५ हजार २५० आहे. यापैकी सध्या फक्त ३०० ते ४०० मजुरांचे ई-मस्टर काढून रोजगार सुरु आहे. मात्र जॉबकार्ड धारक ८१ च्या हजार मजुरांना रोजगार हमीवर काम मिळत नसल्याने रोहयो मजुरांचे स्थलांतर व्हायला सुरूवात झाली आहे. महिला, पुरुष कुटुंबासह आणि तरुणवर्ग असे रोज शेकडो रोहयो मजूर मिळेल ते काम करण्यासाठी मजुरीसाठी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरकडे निघत आहेत. ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला कामे मिळावीत म्हणून शासनाने मोठा गाजावाजा करीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरु केली. मागेल त्याला काम असे शासनाचे निर्देश असतानाही मजुरांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे जव्हार तालुक्यातील रोहयो मजुरांना कायम भेडसावणारी समस्या बनली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही येथील रोहयो मजूर शेतीची अल्प कामे आटोपून पिके खळ्यावर जमा करून शेकडो मजूर मजुरीसाठी निघाले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -