घरपालघरबनावट दाखल्यांप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास चालढकलपणा

बनावट दाखल्यांप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास चालढकलपणा

Subscribe

या गावठाण जागेची विक्री ही हात नकाशाच्या आधारे करण्यात आली असून या प्रकरणातील सर्व दोषींविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात नमूद करण्यात आली आहे.

सचिन पाटील, बोईसर: दांडीपाडा येथील गावठाण जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तावेज तयार करून जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी चौकशी होऊन पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.मात्र याप्रकरणी बोईसर ग्रामपंचायतीकडून चालढकलपणा करण्यात येत असून यामध्ये सामील असणार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपाला बळकटी मिळत आहे. बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रातील दांडीपाडा या महसुली गावातील ३५ गुंठे गावठाण जमिनीचे ग्रामपंचायतीचे प्रत्येकी ७ बनावट दाखले तयार करून ती जागा परप्रांतीयांना लाखो रुपयांना परस्पर विक्री केल्याप्रकरणी पालघर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.यानंतर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता ग्रामपंचायतीने जमीन व्यवहारासाठी कोणतेही दाखले दिले नसल्याचे उघडकीस आले आहे. तसेच दस्तावेज नोंदवण्यासाठी बनावट गावठाण दाखल्याचा वापर करण्यात आल्याचे ५ डिसेंबर रोजी घेतलेल्या सुनावणीनंतर स्पष्ट झाले होते. या गावठाण जागेची विक्री ही हात नकाशाच्या आधारे करण्यात आली असून या प्रकरणातील सर्व दोषींविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात नमूद करण्यात आली आहे.

दांडीपाडा येथील जमिनीचा बनावट गावठाण दाखल्यांचे आधारे व्यवहार करण्याचा आरोप असलेले गृहस्थ हे सध्या बोईसर ग्रामपंचायतीच्याच्या सरपंच पदी विराजमान असून त्यांना वाचवण्यासाठी बोईसर ग्रामपंचायत आणि पालघर पंचायत समिती प्रशासनावर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे बनावट दाखल्यांचा वापर स्पष्टपणे दिसून येत असताना व चौकशी अहवालात हे स्पष्ट झाले असताना १५ दिवसांच्या कालावधीत कोणताही फौजदारी गुन्हा दाखल न करण्याचे तात्पर्य बोईसरच्या ग्रामविकास अधिकारी यांनी दाखवले नसल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्याकडे विचारणा केली असता या बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या व्यवहारासंदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित होणार असल्याचे तसेच यात सामील इसम हे न्यायालयात गेले असल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -