घरताज्या घडामोडीपनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

Subscribe

पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे रुळाचे काम सुरु असताना झालेल्या ब्लास्टिंगमुळे हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना ब्लास्टींगमध्ये मोठे दगड उडून रस्त्यावर पडल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

- Advertisement -

पनवेल-कर्जत या नव्या रेल्वे मार्गाचं काम चालू आहे. त्यामुळे या मार्गातील दगड फोडण्यासाठी स्फोट घडवले जात आहेत. ब्लस्टिंगमुळे मोठे दगड रस्त्यावर आल्याने हा अपघात घडला. स्थानिकांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हे ब्लास्टिंग कर्जत-चौक रस्त्यापासून साधारण २० मीटर अंतरावर करण्यात आले असून ते करताना या परिसराची कोणतीच काळजी न घेता आणि या मार्गावरील वाहतूक विशिष्ट अंतरावर न थांबवता ब्लास्टिंग केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होत दोघांना जीव गमवावा लागला आहे. ब्लास्टिंगमुळे उंच उडालेले दगड रस्त्याच्या कडेला असलेल्या फुले, भाजी आणि चिकन आदी दुकानांत उडून हे दुकानदारदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्या दुकानांचेही नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : रोबोटमुळे उल्हासनगरातील ड्रेनेज सफाईला गती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -