घरमुंबईहिमालय पुलाचे गर्डर बसविण्यासाठी रविवारचा मुहूर्त; नववर्षात हिमालय सर्वांसाठी खुला होणार

हिमालय पुलाचे गर्डर बसविण्यासाठी रविवारचा मुहूर्त; नववर्षात हिमालय सर्वांसाठी खुला होणार

Subscribe

मुंबई -: सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया मुख्यालय परिसर यांना जोडणारा ‘हिमालय’ पूल आता नवीन वर्षात उभा राहणार आहे. १४ मार्च २०१९ रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर सदर पुलाचे काम काही कारणास्तव रेंगाळले होते. मात्र आता या पुलाच्या उभारणीचे काम जलदगतीने सुरू आहे. या पुलाच्या उभारणीसाठी आणण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे पाच गर्डर येत्या रविवारी रात्रीच्या सुमारास नव्याने उभारलेल्या पिलरवर चढविण्याचे व त्याची फिटिंग करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी काही काल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया मुख्यालय परिसर यांना जोडणारा ‘हिमालय’ पूल हा पादचार्यांसाठी महत्वाचा पूल मानला जात होता. या पुलावरून हजारो लोकांची दिवसभरात ये – जा सुरू असायची. मात्र १४ मार्च २०१९ रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग अचानक कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले होते. त्यावेळी हा पूल अथवा त्याचा काही भाग पडून कोणी जखमी अथवा मृत्यूमुखी पडेल, असे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते. तसा विचारही कोणाच्या मनाला शिवला नव्हता. मात्र त्या दिवशी सदर दुर्दैवी घटना घडली व मुंबई हादरली. या घटनेनंतर सदर पुलाचे उर्वरित बांधकाम दुसऱ्या दिवशीच जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र त्यानंतर पुलाच्या बांधकामासाठी नेमलेल्या कंत्राटदारावरून कायदेशीर प्रकरण उदभवले होते. त्यातच पावसाचा अडथळा आला. इतर काही कारणे पाहता या पुलाच्या उभारणीला काहीसा विलंब झाला. मात्र आता या पुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत पुलासाठी आवशयक पिलर ठिकठीकाणी उभारण्यात आले आहेत. आता त्या पिलरवर चढविण्यासाठी आसाम येथून स्टेनलेस स्टीलचे व दीर्घकाळ टिकणारे पाच गर्डर पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी आणण्यात आले आहेत. आता वाहतूक विभागाची परवानगी मिळताच येत्या रविवारी रात्रीच्या सुमारास हे गर्डर सदर उभारलेल्या पिलरवर बसविण्यात येणार आहेत. तसेच, या पुलासाठी सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पुलावर चढणे व पुलावरून खाली उतरणे सुलभ होणार आहे. पुलाचे सर्व काम येत्या एक – दीड महिन्यात पूर्ण करून पूल जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे.


दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला; माजी पीएचा धक्कादायक आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -