घरक्रीडाविराट कोहलीने शतक करत सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

विराट कोहलीने शतक करत सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीने २५ वे कसोटी शतक झळकावले आहे.

पर्थ येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्घ कसोटी सामन्यात टीम भारताचा कर्णधार विराट कोहली यांने स्फोट खेली करत शतक झळकावले आहे. प्रथम उपकर्णधार अजिंक्य रहाणे बरोबर आणि त्यानंतर नवोदित हनुमा विहारीबरोबर भागीदार करत कोहलीने ही कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील २५ वे कसोटी शतक झळकावले असून सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात जलदगतीने कसोटी शतक झळकवणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. बॅडमन यांनी ७० वर्षांपूर्वी केवळ ६८ डावांमध्ये २५ वे कसोटी शतक पूर्ण करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. तर विराटने १२७ डावांमध्ये ही कामगिरी पार पाडली आहे. या खेळीबरोबरच विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला आहे. विराटने आपली २५ शकते पूर्ण करण्यासाठी १२७ डाव खेळले. मात्र हे पूर्ण करण्यासाठी सचिनला १३० डाव खेळावे लागले होते.

- Advertisement -

अशी केली कामगिरी

टीम इंडियाचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर विराटने चेतेश्वर पुजाराच्या साथीने ७४ धावांची भागिदारी करुन भारतीय संघाला सुस्थितीत आणले आहे. पुजारा २४ धावांवर बाद झाल्यानंतरही मैदानावर टिकून राहणाऱ्या विराटने राहाणेच्या साथीने ९१ धावांची भागिदारी केली. यावेळी त्याने कसोटी कारकीर्दीतील २० वे अर्धशतकही ठोकले आहे. तर रहाणेने कसोटी कारकीर्दीतील २० वे अर्धशतक ठोकले. तर राहाणे कसोटी कारकीर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावले आहे. रहाणेने १०५ चेंडूत ५१ धावा केल्या असून त्यांनी त्यात चौकारांचा आणि एका षटकाराचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान या सामान्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच (५०), हॅरिर (७०) आणि हेड (५८) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली. इशांत शर्माने सर्वाधिक ४ बळी घेत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यास प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत भारताने ३ बाद १७२ धावा केल्या. मात्र कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली आहे.


वाचा – आम्ही मर्यादा सोडून वागणार नाही ! – विराट कोहली

वाचा – IND vs AUS : विराटचा जोरदार सराव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -