घरमहाराष्ट्रमुंबईतील आदिवासी पाड्यांबाबत विधानसभेत चर्चा, गावित म्हणतात जानेवारीत दौरा करू!

मुंबईतील आदिवासी पाड्यांबाबत विधानसभेत चर्चा, गावित म्हणतात जानेवारीत दौरा करू!

Subscribe

Maharashtra Winter Session 2022 | डॉ.विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आदिवासी पाड्यांमध्ये दौरा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणी रविंद्र वायकर यांनी केली. यावर उत्तर देताना जानेवारी महिन्यात दौरा केला जाईल, असं आश्वासन विजयकुमार गावित यांनी दिलं.

Maharashtra Winter Session 2022 | नागपूर – विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस असून कामकाजाला सुरुवात होताच मुंबईतील आदिवासी पाड्यांचा प्रश्न लक्षवेधीत छेडण्यात आला. शहरात असलेले हे आदिवासी पाडे विकासापासून वंचित असून नागरी सुविधाही येथे उपलब्ध नसल्याची तक्रार आमदार रविंद्र वायकर, आमदार वर्षा गायकवाड यांनी केली. यावर आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आदिवासी पाड्यांतील विकासासाठी जानेवारी महिन्यात दौरा करणार असल्याचे जाहीर केले.


मुंबईतील बोरिवलीतील आरे कॉलनीत आणि जोगेश्वरी येथे आदिवासी पाडे आहेत. आदिवासी हे मुंबईचे मुळचे रहिवासी असतानाही त्यांना अद्यापही नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. पाणी, रस्ते, शिक्षण, रोजगारांपासून आदिवासी समाज वंचित आहे. त्यामुळे त्यांच्या उन्नतीसाठी सरकारने काय धोरण आखले आहे असा प्रश्न आमदार रविंद्र वायकर यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं.

- Advertisement -

हेही वाचा – विदर्भाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

डॉ.विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आदिवासी पाड्यांमध्ये दौरा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणी रविंद्र वायकर यांनी केली. यावर उत्तर देताना जानेवारी महिन्यात दौरा केला जाईल, असं आश्वासन विजयकुमार गावित यांनी दिलं.

- Advertisement -


आरे कॉलनीत पुनर्वसन करणार

आदिवासी पाड्यातील आदिवासी समाजाला हाकलून दिले जात आहे. मात्र, असं न करता आदिवासी पाड्यांची ओळख जपली पाहिजे. त्यांनी निसर्गाचं संरक्षण केलं आहे म्हणून तिथं झाडं राहिली आहेत. आरे कॉलनी परिसरात जंगलाच्या झाडांसाठी शासनाचे काय धोरण आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर आदिवासी समाजाला त्यांच्या पाड्यापासून कोणीच बाहेर काढणार नसून त्यांचं तिथे पूनर्वसन करणार असल्याचं विजयकुमार गावित यांनी घोषित केले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -