घरताज्या घडामोडीभाजपाच्या 'या' नेत्यांचे कर्करोगामुळे निधन

भाजपाच्या ‘या’ नेत्यांचे कर्करोगामुळे निधन

Subscribe

भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांना कर्करोचा सामना करावा लागला होता. परंतु, त्या नेत्यांचीही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली होती. हे नेते कोण आहेत, हे थोडक्यात जाणून घेऊयात...

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर या भाजपाच्या बड्या नेत्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. मात्र, याआधीही भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांना कर्करोगाचा सामना करावा लागला होता. परंतु, त्या नेत्यांचीही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली होती. हे नेते कोण आहेत, हे थोडक्यात जाणून घेऊयात… (Arun Jaitley Manohar Parrikar Laxman Pandurang Jagtap Mukta Tilak Ananth Kumar This Bjp Leader Died Due To Cancer)

लक्ष्मण जगताप

- Advertisement -

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (60) यांचे मंगळवारी (3 जानेवारी 2023) सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

  • लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवड शहरात गेली 35 वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिले आहेत.
  • पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती.
  • १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले.
  • स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली.
  • सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते.
  • २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला
  • २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली.
  • २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले.
  • सांगवी येथील गणेश को-ऑपरेटिव्ह बँक, न्यू मिलेनियम स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ सायन्स एन्ड कॉमर्स आदी
  • संस्थांचे ते संस्थापक होते. पतंजली संस्था, हरिद्वारचे ते संस्थापक सदस्य होते.

मुक्ता टिळक

- Advertisement -

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील वर्षी 22 डिसेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • मुक्ता टिळक यांचा राजकीय प्रवास नगरसेविका म्हणून सुरू झाला होता. त्या चारवेळा नगरसेविका होत्या.
  • सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या.
  • पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर 2017 साली त्या पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाल्या.
  • मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते.
  • मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या.

मनोहर पर्रीकर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही कर्करोगामुळे निधन झाले. मनोहर पर्रीकर वर्षभराहून अधिक काळ कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांचे पणजी येथे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. निधनाच्या दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती.

  • वर्ष 2000 ते 2005, 2012 ते 2014 आणि 2017 ते आतापर्यंत अशा कालावधीमध्ये ते गोव्याचे मुख्यमंत्री होते.
  • 2014 ते 2017 या काळामध्ये संरक्षणमंत्रीपदी कार्यरत होते.
  • मनोहर पर्रिकर यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी म्हापसा येथे झाला.
  • लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आल्यामुळे त्यांनी संघटनेतील विविध जबाबदाऱ्या गोव्यामध्ये पार पाडल्या.
  • 1994 साली पर्रिकर गोवा विधानसभेत प्रवेश केला.
  • 1999 साली ते गोवा विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते.
  • 1994, 1999, 2002, 2007, 2012 यावर्षी पणजी मतदारसंघातून गोवा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये आणि 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला.

अरुण जेटली

भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नवी दिल्लीमध्ये निधन झाले. 24 ऑगस्ट 2019 रोजी अरुण जेटली यांचे दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. अरुण जेटली यांच्यावर वेगवेगळ्या विभागांच्या डॉक्टरांचे पथक उपचार करत होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे जेटलींना रुग्णालयात दाखल केले गेले. निधनापूर्वी जेटली हे अनेक महिने कर्करोग या आजाराशी झुंज देत होते. मात्र, जेटलींची ही झुंज अपयशी ठरली.

आपल्या युक्तिवाद पूर्ण वक्तृत्वाने भल्याभल्यांना गारद करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या राजकीय प्रवासास विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात झाली होती. जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवतानाच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता. विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कायदा मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द प्रचंड गाजली होती.

  • निष्णात वकील, अनुभवी संसदपटू, मंत्री म्हणून अरुण जेटली यांनी प्रभावी कामगिरी केली.
  • देशाच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.
  • कोणतीही जबाबदारी समर्थपणे पेलणे ही त्यांची ओळख होती.
  • वकिली करत असताना राजकारणात आलेल्या अरुण जेटलींचा भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये समावेश होता.
  • अरुण जेटली हे दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिले असून राज्यसभेचे सदस्य होते.
  • 2009 मध्ये जेटलींची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
  • दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) ते 1999 ते 2013 या कालावधीत अध्यक्ष होते.
  • २८ डिसेंबर १९५२ मध्ये अरुण जेटली यांचा जन्म झाला होता.
  • अरुण जेटली यांनी दिल्लीतच प्राथमिक आणि उच्च शिक्षण घेतलं.
  • कॉमर्स शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती.
  • जेटलींनी विद्यार्थी दशेतच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होऊन राजकारणात भाग घेतला होता.
  • विद्यार्थी परिषदेचे दिल्लीचे अध्यक्ष आणि पुढे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले होते.
  • भारतीय युवा मोर्चाचेही अध्यक्ष होते.
  • कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ देशातील अनेक उच्च न्यायालयात वकिली केली.
  • १९७५-७७मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
  • आणीबाणीत त्यांना आधी अंबाला आणि नंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांची अभाविपच्या
  • राष्ट्रीय सरचिटणीसपदी आणि अभाविपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
  • १९८९मध्ये त्यांची अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • १९९०मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकीलाचा दर्जा दिला.
  • १९९१ पासून ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते
  • १९९९मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला.
  • वाजपेयींच्या सरकारमध्ये जेटलींकडे निर्गुंतवणूक खात्याचं राज्यमंत्रीपदही देण्यात आलं होतं
  • २००० मध्ये त्यांच्याकडे विधी, न्याय मंत्रालयाचा कार्यभार होता.
  • २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली.
  • २०१४मधून ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले.
  • २०१४-१६मध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभार पाहिला.
  • २०१४-१७ मध्ये त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला.

अनंत कुमार

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी पहाटे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. अनंतकुमार हे 59 वर्षांचे होते. अनंतकुमार यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाला होता. निधनापूर्वी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यावेळी मे महिन्यात कर्नाटकमधील निवडणुकांसाठीच्या प्रचारादरम्यान कफाचा त्रास बळावल्याने त्यांना उपचारांसाठी लंडन तसंच न्यूयॉर्क येथे जावं लागलं होतं.

  • अनंत कुमार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला होता.
  • सुरुवातीला त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला.
  • आणीबाणीच्या वेळी अनंतकुमार यांनी इंदिरा गांधी सरकारविरोधात आघाडी केली होती.
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांसह ते तुरुंगातही गेले. त्यानंतर त्यांना सुमारे 30 दिवस तुरुंगात राहावे लागले.
  • 1987 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
  • कर्नाटकात भाजपच्या उदयात अनंत कुमार यांचा मोठा हात आहे.
  • 1996 पासून ते बंगळुरु दक्षिण मतदारसंघातून लोकसभा खासदार होते.
  • 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ते सर्वात तरुण केंद्रीय मंत्री बनले.
  • अनंत कुमार नागरी उड्डाण, पर्यटन, क्रीडा, युवा व्यवहार आणि संस्कृती, शहरी विकास आणि गरीबी निर्मूलन मंत्री होते.
  • 1996, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये बेंगळुरू दक्षिणमधून सलग 6 विजय झाल.
  • केंद्र सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री होते.
  • जुलै 2016 पासून त्यांच्याकडे संसदीय कार्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -