घरमनोरंजनVideo : मुसलमान भारताला हिंदुस्थान का म्हणतात? शरद पोंक्षेंचा तो व्हिडीओ व्हायरल

Video : मुसलमान भारताला हिंदुस्थान का म्हणतात? शरद पोंक्षेंचा तो व्हिडीओ व्हायरल

Subscribe

Sharad Ponkshe | शरद पोंक्षे नेहमीच विविध मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत असतात. मी नथुराम गोडसे बोलतोय या त्यांच्या नाटकामुळे ते सतत चर्चेत आणि वादात असतात. धर्माभिमान जागवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सध्या व्हायरल होत असलेला या व्हिडीओमधूनही त्यांनी धर्माभिमान जागवण्याचा प्रयत्न केला आहे.

Sharad Ponkshe | मुंबई – वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून मुसलमान समाज भारताला हिंदुस्थान का म्हणतो हे या व्हिडीओतून सांगितलं आहे.

शरद पोंक्षे नेहमीच विविध मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत असतात. मी नथुराम गोडसे बोलतोय या त्यांच्या नाटकामुळे ते सतत चर्चेत आणि वादात असतात. धर्माभिमान जागवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सध्या व्हायरल होत असलेला या व्हिडीओमधूनही त्यांनी धर्माभिमान जागवण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर हातात शस्त्रच असावं लागतं, शरद पोंक्षेंचं धारदार वक्तव्य

“आपण अधिकतम हिंदू आपल्या देशाला भारत म्हणतो, इंडिया म्हणतो. आपण स्वतःला भारतीय म्हणवून घेतो, पण अधिकतम मुसलमान हिंदुस्थान म्हणतात. त्यांना हा देश म्हणजे भारत किंवा इंडिया नाही वाटत, कारण त्यांना कळलं आहे की हे हिंदू लोकांचं स्थान आहे. आम्ही मात्र त्यांना खुश करण्यासाठी याला भारत म्हणतो. भारतीय म्हंटलं की सगळे येतात त्यात, हिंदुस्थान म्हंटलं की बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो. त्यांना लाज वाटत नाही हिंदुस्थान म्हणायला, पण आपल्याला वाटते. त्यांना अजूनही त्यांचा माणूस दिल्लीच्या गादीवर बसत नाही ती सल त्यांच्या मनात सलतीये की हा हिंदुस्थान आहे,” असं शरद पोंक्षे व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

- Advertisement -


काही दिवसांपूर्वी त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामध्ये त्यांनी राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर हातात शस्त्रच असावं लागतं, असं वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा – शरद पोंक्षेंनी घेतली शरद पवारांची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

इतिहास जर तुम्ही वाचलात. तर तुमच्या लक्षात येईल की, इतिहास हा नेहमी जेत्यांचा असतो. पराभूतांना इतिहास नसतो. पराभूतांचा कधीही कुणीही इतिहास लिहीत नाही. पराभूतांना भविष्य नसतं, वर्तमान नसतं आणि भूतकाळही नसतो, असं टॉलस्टॉयने म्हणून ठेवलं आहे. पण जेत्यांना ते असतं. शांती, अहिंसा हे जे आदर्श दाखवले जातात ना ते पोवाड्यांमध्ये, गाण्यांमध्ये बरे वाटतात. राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर हातात शस्त्रच असावं लागतं. शस्त्राशिवाय पर्याय नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -