घरमहाराष्ट्रगोपनीयता जपण्याकरता सरकारी अधिकाऱ्यांकडून फेसटाइमचा वापर, हायकोर्टाची टिप्पणी

गोपनीयता जपण्याकरता सरकारी अधिकाऱ्यांकडून फेसटाइमचा वापर, हायकोर्टाची टिप्पणी

Subscribe

FaceTime | फेसटाईमच्या माध्यमातून झालेले कॉल रेकॉर्ड सायबरतज्ज्ञांकडून तपासण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

मुंबई – गोपयनीयता जपण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडून फेसटाईम या यंत्रणेचा वापर केला जातोय, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मुंबई उच्च न्यायालायने आज केली. एसआरएने खोट्याप्रकरणात गोवले असल्याने प्रवणी कलमे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणातील सुनावणीत एसआरए प्रथमदर्शनी गुन्हेगार असल्याचं दिसत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे फेसटाईमच्या माध्यमातून झालेले कॉल रेकॉर्ड सायबरतज्ज्ञांकडून तपासण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा – मुंबई मॅरेथॉनमध्ये हजारो सीनिअर सिटिझन्स धावणार, ९१ वर्षीय आजी आणि ८९ वर्षीय आजोबांचीही नोंदणी

- Advertisement -

झोपडपट्टी पुनर्विकास कार्यालयातून काही गोपनीय कागदपत्रे चोरीला गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कलमे यांच्यावर एप्रिल २०२२ मध्ये करण्यात आला होता. याप्रकरणी हा गुन्हा रद्द करण्याकरता प्रवीण कलमे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी आज न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे सुनावणी झाली.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा प्रवीण कलमे यांनी केला आहे. जी कागदपत्रे आपल्याकडे आरटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात ती आपण का चोरू असा युक्तीवाद प्रवीण कलमे यांनी त्यांच्या वकील विक्रम सुतारिया यांच्यातर्फे केला.

- Advertisement -

हेही वाचा – … म्हणून अंबानींच्या शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी; आरोपीच्या अटकेसाठी पोलीस गुजरातला रवाना

जर एखादी व्यक्ती एसआरए कार्यलयात शेकडो आरटीआय दाखल करत असेल तर तर ती व्यक्ती अधिका-यांच्या परवानगीविना त्यांच्या दालनात कशी जाऊ शकते?, असा सवाल हायकोर्टाने तपास अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.

एसआरए अधिकाऱ्यांनी फेसटाईमवरून कॉल करत भेटायला बोलावले होते. त्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करण्यासही मी तयार आहे, असा दावा प्रवीण कलमे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी साबयर तज्ज्ञांकडून फेसटाइमचे कॉल रेकॉड्स तपण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसंच, याप्रकरणातील पुढील सुनावणी आता १९ जानेवारीला होणार आहे.

हेही वाचा– जॉन्सन ॲण्ड जॉन्सन बेबी पावडर विक्रीवरील निर्बंध हायकोर्टाने हटवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -