घरमहाराष्ट्रसंजय राऊतांची ऑन कॅमेरा शिवीगाळ, नारायण राणेंबाबत बोलताना जीभ घसरली

संजय राऊतांची ऑन कॅमेरा शिवीगाळ, नारायण राणेंबाबत बोलताना जीभ घसरली

Subscribe

Sanjay Raut abuse to Narayan Rane | विरोधकांवर टीका करताना संजय राऊतांची सातत्याने जीभ घसरते. याआधीही त्यांनी अनेकदा ऑन कॅमेरा अनेकांवर आगपाखड केली आहे. आजही पुन्हा त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या तोंडून असंसदीय शब्दांचा वापर झाल्याने नारायण राणे आता त्यांच्याविरोधात काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.

Sanjay Raut abuse to Narayan Rane | मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील नेते यांच्यातील कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. एकमेकांविरोधात बोलताना दोघांनीही आगपाखड केली आहे.दोहोंकडूनही खालच्या पातळीवर टीका होत असते. आता पुन्हा एकदा नारायण राणेंबाबत बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली. संजय राऊतांनी यावेळी थेट नारायण राणेंना शिवीच दिली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत विविध मुद्द्यांवर बोलत होते. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारला. मात्र, त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी जाऊद्या रे, तो काय… आहे.. अशा शब्दांत त्यांच्यावर शिवीगाळ केली.

- Advertisement -


विरोधकांवर टीका करताना संजय राऊतांची सातत्याने जीभ घसरते. याआधीही त्यांनी अनेकदा ऑन कॅमेरा अनेकांवर आगपाखड केली आहे. आजही पुन्हा त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या तोंडून असंसदीय शब्दांचा वापर झाल्याने नारायण राणे आता त्यांच्याविरोधात काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.


दरम्यान, आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र डागलं. दाओसला जाण्याऐवजी शिंदेंनी गुजरातला जावं, असा खोचक टोला राऊतांनी लगावला. तसंच, दाओसला कसे करार होतात, किती करार होतात हे आम्हाला माहिती आहे, असंही राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – जी २० परिषदेला सुरुवात, नारायण राणेंनी केले उद्घाटन; पायाभूत सुविधांवर होणार विचारमंथन

भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी मकर संक्रांतीनिमित्त गोड बोलण्याचे संजय राऊत यांना आवाहन केले होते. त्यावर संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला. राऊत म्हणाले की, गोड बोलण्यासाठी मला स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची आवश्यकता वाटत नाही.

पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला डाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. यावरून संजय राऊतांनी मोदींवरही टीकास्त्र डागलं. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प कार्यान्वित झाली. त्याच प्रकल्पासाठी हे सरकार पंतप्रधानांना बोलावून श्रेय घ्यायचं काम करतंय. यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा प्रयत्न आहे. ज्या प्रकल्पांच्या योजना आम्ही केल्या, प्रधानमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत महत्त्व वाटत नसेल तर त्यांना करू द्या.

बोलणं सुरू आहे

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यासंदर्भात आम्ही दुपारी बैठक घेणार आहोत.नाशिक मतदारसंघात कोणता निर्णय घ्यावा व नागपूरसाठी काय निर्णय घ्यावा याबाबत भूमिका स्पष्ट करू. याबाबत थोड्यावेळापूर्वी माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशीमध्ये देखील चर्चा झालेली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोणता निर्णय घ्यावा, नागपूरबाबत आज ठरेल. दूरध्वनीवर पवारांसोबत बोलणं झालं आहे. ठाकरेंशीही चर्चा झाली आहे. एकमेकांशी संवाद सुरू आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -