घरताज्या घडामोडीत्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा; 'या' तारखेला होणार मतदान

त्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा; ‘या’ तारखेला होणार मतदान

Subscribe

भारताच्या इशान्येकडील तीन राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

भारताच्या इशान्येकडील तीन राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. (Voting for Assembly elections in Tripura Nagaland and Meghalaya)

मिळालेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारीला त्रिपुरामध्ये मतदान होणार असून, नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच, 2 मार्च रोजी निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.

- Advertisement -

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये 62.8 लाख मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. त्यापैकी सुमारे 32 लाख महिला मतदार असल्याची माहिती मिळते. दरम्यान, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 सदस्यांच्या विधानसभा आहेत.


हेही वाचा – दावोसमध्ये मोदींचे आकर्षण आणि महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -