घरक्रीडासीएसकेने 'असा' साजरा केला विजयाचा आनंद

सीएसकेने ‘असा’ साजरा केला विजयाचा आनंद

Subscribe

 

क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल एक पर्वणी असते. नुकताच आयपीएलचा ११ वा सीझन संपला. यंदाच्या आयपीएलच्या विनिंग ट्रॉफीवर चेन्नई सुपर किंगने आपलं नाव कोरलं. चेन्नईच्या फॅन्सनी हा विजयाचा आनंद देशभर साजरा केला. चेन्नईच्या टीमनेसुद्धा हा आनंद साजरा केला. आता तुम्ही त्यांचं मॅच जिंकल्यानंतरच सेलिब्रेशन पाहिलं असेलच. पण ड्रेसिंग रुममध्ये त्यांनी कशा पद्धतीने आनंद साजरा केला हे पाहिलं आहे का?

- Advertisement -

चॅम्पियन ब्राव्होचा डान्स जलवा

ड्रेसिंग रुममधल्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. चेन्नईने मॅच जिंकल्यानंतर ब्राव्हो आपल्या ‘चॅम्पियन्स’ गाण्यांवर थिरकला. तर दाक्षिणात्य गाण्यावर इतर खेळाडूंसोबत त्याने ठेका धरला. ड्रेसिंग रुममधल्या या आनंदाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नाचावेसे वाटले नाही, तर नवल!

- Advertisement -

वॉटसनने मिळवून दिला विजय

रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर रंगला. चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला बॅटिंगची संधी दिली. हैदराबादच्या टीमने २० षटकांत १७९ धावांचं आव्हान चेन्नईला दिलं होतं. शेन वॉटसनच्या शतकी खेळीमुळे चेन्नईनं धावांचं आव्हान सहज पार केलं. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ११७ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे विजयाचं पारडं चेन्नईकडे झुकलं होतं. वॉटसनच्या धावांच्या जोरावर चेन्नईने अंतिम फेरीत हैदराबादवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.

 

(सौजन्य- युट्युब)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -