घरमहाराष्ट्रकर्नाटकातून येताना बेळगावसह..., सीमावादावरून राऊतांनी मोदींना डिवचलं

कर्नाटकातून येताना बेळगावसह…, सीमावादावरून राऊतांनी मोदींना डिवचलं

Subscribe

PM Narendra Modi on Mumbai Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी ते कर्नाटकात जाणार आहेत. त्यामुळे कर्नाटक सीमाभागात अत्याचर सुरू आहेत. कर्नाटकातून येताना त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात याबाबत घोषणा करावी, असं आवाहन संजय राऊतांनी मोदींना केलं आहे.

PM Narendra Modi on Mumbai Visit | मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत येण्याआधी ते कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कर्नाटकातून येताना बेळगावसह सीमाभागात अत्याचार सुरू आहेत त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात घोषणा करावी, असं संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘असे’ असेल मुंबई भेटीचे नियोजन

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अद्यापही शमलेला नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन्ही राज्यांनी शांततेत वाद सोडवावा असे आदेश केंद्राकडून आले आहेत. त्यामुळे सीमावादाप्रश्नी दोन्ही राज्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. दरम्यान, याच वादावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी ते कर्नाटकात जाणार आहेत. त्यामुळे कर्नाटक सीमाभागात अत्याचार सुरू आहेत. कर्नाटकातून येताना त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात याबाबत घोषणा करावी, असं आवाहन संजय राऊतांनी मोदींना केलं आहे.

आमच्या कामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते

- Advertisement -

शिवसेनेच्या कार्यकाळात महापालिकेने जी कामे केली आहेत, त्या कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. यातच शिवसेनेचं यश आहे. आम्हाला त्याचा आनंद आहे. शिवसेनेमुळे ज्या कामांना गती मिळाली त्या कामांचं उद्घाटन करून मोदी प्रचारांचं भूमिपूजन करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – मुंबईत आज ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेत बदल; मनस्ताप टाळण्यासाठी ‘ही’ बातमी वाचा

मोदींचा महाराष्ट्र आणि कर्नाटक दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. कर्नाटकात १०,८०० कोटी आणि महाराष्ट्रात ३८,८०० कोटींपेक्षा जास्त विकासकामाकांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शोसुद्धा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे. त्यामुळे मुंबई दौऱ्यासाठी मोठी तयारी सुरू झाली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -