घरदेश-विदेशBBC Documentary Row : जेएनयू वादावर अद्याप कोणताही FIR दाखल नाही

BBC Documentary Row : जेएनयू वादावर अद्याप कोणताही FIR दाखल नाही

Subscribe

गुजरात दंगलीवर आधारित पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून जवाहरलाल नेहरु विद्यापीठात मंगळवारी विद्यार्थ्यांवर दगडफेकीची घटना घडली. विद्यापीठात डॉक्युमेंट्री पाहताना ही दगडफेक झाली ज्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री 9 वाजता डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग ठेवलं होतं. मात्र यापूर्वीच विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील वीज पुरवठा खंडित करण्यात आवा, जेएनयू प्रशासनाने या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगला परवानगी नाकारली. मात्र या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

वीज पुरवठा बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी सेलफोन आणि लॅपटॉपवर डॉक्युमेंट्री पाहिली. याचवेळी काही लोकांनी झुडपातून विद्यार्थ्यांवर दगडफेक केली, एबीव्हीच्या विद्यार्थ्यांवर या दगडफेकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांविरोधात चौकशी सुरु केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी दगडफेकीची तक्रार केली असून आम्ही त्याबाबत चौकशी करत आहोत. जेएनयू कॅम्पसमध्ये रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी केलेल्या गोंधळाबाबत दोन्ही पक्षांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, जेएनयूमध्ये यापूर्वीही असे घटक होते जे देश तोडण्याचा प्रयत्न करत होते – तुकडे तुकडे गँग. ते संकट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला आशा आहे की पोलिस या गैरप्रकारांवर कारवाई करतील. मंगळवारी रात्री अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॅम्पसपासून वसंत कुंज पोलिस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

जवाहरलाल नेहरू स्टुडंट युनियनच्या अध्यक्षा आयशा घोष यांनी सांगितले की, त्यांनी दगडफेकीची तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करू, असे आश्वासन दिले. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व लोकांची नावे आणि इतर माहिती दिली आहे. डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवेळी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केली, असा आरोपही त्यांनी केला.

आयशा घोष पुढे म्हणाल्या की, अभाविपने दगडफेक केली, परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्ही स्क्रीनिंग पूर्ण केले आहे. वीज पूर्ववत करणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही एफआयआर दाखल करू.

जेएनयू एबीव्हीपीचे अध्यक्ष रोहित यांनी सांगितले की, जेएनयू प्रशासनाने बीबीसीची डॉक्युमेंटरी न दाखवण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने अभाविपच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न केला. DU आणि जामिया विद्यापीठातील विद्यार्थी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी आले होते.


फडणवीसांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो गायब, राजकीय चर्चांना उधाण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -