घरपालघरटेम्बा रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर चालविण्यास देण्याची मागणी

टेम्बा रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर चालविण्यास देण्याची मागणी

Subscribe

राज्य शासनाकडून भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे २०० खाटांचे रुग्णालय महापालिकेकडून उभारण्यात येऊन राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

इरबा कोनापुरे, भाईंदर : मीरा -भाईंदर मधील राज्यशासनाचे एकमेव असलेले पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ( टेंबा ) हे चालविण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप ( पीपीपी ) तत्वावर देण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. भाईंदर पश्चिमेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शहरातील सर्व सामान्य जनतेला मोफत उपचार मिळावे यासाठी आमदार गीता जैन यांचे प्रयत्न सुरू असून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाकडून भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे २०० खाटांचे रुग्णालय महापालिकेकडून उभारण्यात येऊन राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

परंतु रुग्णालयातील अपुर्‍या वैद्यकीय सुविधा व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यामुळे तसेच योग्य त्या व्यवस्थापनाच्या अभावामुळे रुग्णांवर योग्य ते उपचार मिळत नाहीत. त्याचाच मोठा फटका मीरा- भाईंदरच्या शहरातील नागरिकांना बसत होता. त्यामुळे सदरचे रुग्णालय बंद पडण्याच्या स्थितीत पोहचले आहे. सदर रुग्णालयाला नवसंजीवनी देऊन पुन्हा ते रुग्णालय संपूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी गेली काहि दिवसांपासून जैन सतत राज्य शासनाकडे विविध माध्यमातून पाठपुरावा करत होत्या. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी २४ जानेवारी रोजी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

- Advertisement -

सदर बैठकीत आमदार जैन यांनी आरोग्य मंत्र्यांकडे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ठाणे महानगर पालिकेच्या धर्तीवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप ’पीपीपी’ तत्वावर एका खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्याची मागणी केली. जेणे करून शहरातील नागरिकांना मोफत तसेच योग्य उपचार कसे मिळेतील याबाबतचे एक चित्रफीत दाखवली. त्यावर मंत्र्यांनी तात्काळ उपस्थित आरोग्य अधिकार्‍यांना ह्याबाबत लवकरात लवकर एक प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. तसेच प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ संमत करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार गीता जैन यांना दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -