घरपालघरनवजात शिशूसाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू होणार

नवजात शिशूसाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू होणार

Subscribe

पालघरच्या तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अदानी फाऊंडेशन आणि अदानी इलेक्ट्रिसिटीशी चर्चा करून उपजिल्हा रुग्णालयात एनआयसीयू सुरू करण्यासाठी मदतीची विनंती केली होती.

बोईसर: डहाणू उपजिल्हा रुग्णालयात अदानी समूहाच्या सहकार्याने नवजात शिशूसाठी अतिदक्षता विभागाची लवकरच सुरुवात होणार आहे. डहाणू थर्मल पॉवर स्टेशनने (एडीटीपीएस) पालघर जिल्ह्यातील नवजात शिशूंसाठी पहिल्या अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) स्थापना करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य केले आहे. डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात २ कोटी रुपये खर्च करून एनआयसीयू सज्ज करण्यात येत असून सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता मोहपात्रा,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि अदानी समूहाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिदक्षता विभाग केंद्राचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात दरमहा सुमारे ३०० महिलांची प्रसूती होते. परंतु एनआयसीयू सुविधेच्या अभावी तीन ते चार नवजात बालकांचा मृत्यू होतो. पालघरच्या तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अदानी फाऊंडेशन आणि अदानी इलेक्ट्रिसिटीशी चर्चा करून उपजिल्हा रुग्णालयात एनआयसीयू सुरू करण्यासाठी मदतीची विनंती केली होती.

अदानी फाऊंडेशनने तात्काळ ही विनंती मान्य करून उपजिल्हा रुग्णालयात एनआयसीयू सुविधा सुरू करण्याचे मान्य केले. एनआयसीयूच्या स्थापनेचा संपूर्ण खर्च अदानी फाऊंडेशन उचलणार असून या वर्षी ऑक्टोबरपर्यंत हे युनिट कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या युनिटमध्ये १२ रुग्णालयात दाखल (इनबाउंड) बालके, १२ बाहेरगावावरून दाखल होणारी (आऊटबाउंड) बालके आणि ८ स्तनदा मातांवर उपचार करण्याची सुविधा असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -