घरनवी मुंबईसरकारने लक्ष न दिल्यास माथाडी कामगार जाणार संपावर; युनियनचे नेते नरेंद्र पाटील...

सरकारने लक्ष न दिल्यास माथाडी कामगार जाणार संपावर; युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांचा इशारा

Subscribe

अनेकवेळा माथाडी कामगारांच्या प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, आंदोलन केली तसेच शासनाच्या विविध खात्यांकडे आणि मंत्र्यांकडे पाठपुरावाही केला मात्र सरकार माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. सरकारने माथाडींच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यवाही केली नाही तर येत्या १ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

नवी मुंबई: अनेकवेळा माथाडी कामगारांच्या प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, आंदोलन केली तसेच शासनाच्या विविध खात्यांकडे आणि मंत्र्यांकडे पाठपुरावाही केला मात्र सरकार माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. सरकारने माथाडींच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यवाही केली नाही तर येत्या १ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल काTEAMमगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
माथाडी भवन येथे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यूनियनतर्फे मुकादम कार्यकर्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
या सभेत युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच जितेंद्र येवले, पोपटराव धोंडे, सुरज बर्गे, पांडुरंग धोंडे, संतोष अहिरे, अजय इंगुळकर, नाशिकचे पोटे, संभाजीराव जाधव यांची भाषणे झाली.

विविध मागण्यांचा समावेश
माथाडी कामगारांच्या समस्यांमध्ये माचाही सल्लागार समितीची पुर्नरचना करणे, पुर्नरचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणुक करणे, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुर्नरचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन पुर्नरचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणूका करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

पोलीस संरक्षणाचे नवीन परिपत्रक काढावे
अनुज्ञाप्ती धारक तोलणार आणि मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृह खात्याने संबंधितांची समिती गठीत करावी, पोलीस संरक्षणाचे नवीन परिपत्रक पोलीस यंत्रणेकडून त्वरीत काढावे, अशा विविध मागण्यांबाबत संघटनेने सतत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. सरकारने मात्र नेहमीच दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच माथाडी कामगारांच्या कामगार,गृह, पणन व सहकार आणि संबंधित खात्याअंतर्गत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक संप पुकारण्याच्या तयारीत असल्याचे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -