घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘भाई’ सुटल्याचा आनंद कारागृहाबाहेर साजरा करणे समर्थकांना पडले महागात

‘भाई’ सुटल्याचा आनंद कारागृहाबाहेर साजरा करणे समर्थकांना पडले महागात

Subscribe

नाशिकरोड : येथील कारागृहात चांगली वर्तणुक करणार्‍या कैद्याची न्यायालयाच्या आदेशाने उर्वरित शिक्षा माफ केल्यानंतर प्रजासत्ताकदिनाचे दिवशी सुटका होताच श्रीरामपूर येथील एका कैद्याच्या समर्थकांनी कारागृहाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ व घोषणाबाजी करत कारागृह आवारात प्रतिबंधित मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण केले. याप्रकरणी १५ जणांच्या विरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहरात जमावबंदी व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात चित्रीकरणास बंदी केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करत शाहरुख रज्जाक शेख (रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर) या कैद्याची न्यायालयाच्या आदेशाने उर्वरित शिक्षा माफ करुन गुरुवारी (दि.२६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुटका झाली. दुपारी १२ च्या सुमारास कारागृहाच्या प्रवेशद्वारावर शेख व त्याच्या १२ ते १५ समर्थक आले. समर्थकांनी आरडाओरडा करत जल्लोष केला. शेखच्या समर्थकांनी आ गये भाई बाहर अशी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. शिवाय, मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरण केले. या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच पोलीस वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येताच शाहरुख शेख व त्याचे समर्थकांनी पळ काढला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर अथवा न्यायालयाच्या निकालाने मुक्तता झाल्यानंतर जल्लोष करण्याचा पायंडा पडतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -