घरअर्थजगतकेंद्रीय अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग ?

केंद्रीय अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग ?

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज विधिमंडळात अर्थांसंकल्प सादर केला. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

२०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारचा हा २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यामध्ये अनेक गोष्टी स्वस्त करण्यात आल्या आहेत, तर काही गोष्टी महाग करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त, तर काय महाग झाले आहे.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरज बनलेला मोबाईल फोन स्वस्त झाला आहे. त्याचबरोबर एलईडी टीव्ही, कपडे, खेळणी, मोबाइल कॅमेरा लेन्स, इलेक्ट्रिक गाड्या, हिऱ्यांचे दागिने, बायोगॅसशी संबंधित वस्तू, लिथियम सेल्स आणि सायकल या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत.

- Advertisement -

मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी दुसरीकडे मात्र मद्यपींच्या खिशाला या अर्थसंकल्पामुळे कात्री लागलेली आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सिगारेट आणि मद्य महाग झाले आहे. तसेच छत्री, परदेशी किचन चिमन्या, सोने, आयात केलेली चांदी, प्लॅटिनम, एक्स रे मशीन आणि हिरे महाग झाले आहेत.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना लक्षात घेऊन सदर अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पामुळे शेतकरी वर्ग, मत्स्यपालन व्यवसाय यांसाठी देखील महत्वाच्या अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्याने माध्यम वर्गीय लोकांना याचा फायदा होऊ शकतो, असे बोलले जात आहे. भारतात मद्यावर सर्वाधिक कर आकारणी करण्यात येते. परंतु आता सिगारेट आणि मद्य हे महाग करण्यात आले आहे. त्यामुळे मद्यपींच्या खिशाला कात्री लागली आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हिऱ्यांचे दागिनेदेखील आता स्वस्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -