Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Union Budget 2023 : सरकारी योजनांसाठी 'नो स्ट्रेस', कारभार होईल 'पेपरलेस', अर्थसंकल्पात...

Union Budget 2023 : सरकारी योजनांसाठी ‘नो स्ट्रेस’, कारभार होईल ‘पेपरलेस’, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 5G नेटवर्क, I, DIGILocker संदर्भातही मोठ्या घोषणा केल्या आहेत. या डीजी लॉकरमध्ये स्टोर महत्वाची कागदपत्र ही आधार मान्य असणार आहे. यामुळे तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेसाठी करावी लागणारी केव्हायसी डिजीलॉकरच्या मदतीने पूर्ण करता येणार आहे. तसेच विविध सरकारी योजनांना तुम्हाला वारंवार नव्याने कागदपत्रं सबमिट करण्याची गरज लागणार नाही. यामुळे केंद्र सरकार आता डिजीलॉकर वापराला प्रोत्साहन देणार आहे.

हेही वाचा : Union Budget 2023: देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी सरकारचा नवा प्लान, काय आहे नियोजन?

डिजीलॉकर अॅपचा वापर वाढवणार

याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, डिजीलॉकर अॅप ओळख ही आधार वैध असेल, यामुळे तुम्हाला कोणताही सरकारी फॉर्म भरण्यासाठी सोबत कागदपत्रांची हार्ड कॉपीसोबत ठेवण्याची गरज नाही. मात्र यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर अॅप असणं गरजेच आहे. हा अॅप Android किंवा iPhone दोन्ही मॉडेलवर वापरले जाऊ शकते. हा अॅप तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरुन डाऊनलोड करु शकता.

- Advertisement -

याशिवाय AI साठी सेंटर ऑफ इंटेलिजन्सची स्थापना करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. यासाठी देशात तीन गुप्तचर केंद्र तयार केली जाणार आहेत.

हेही वाचा : Union Budget 2023: पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणून पुरावा, केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अर्थमंत्री सीतारामन यांनी 5G नेटवर्क संशोधणासंदर्भातही एक घोषणा केली आहे. देशात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. यानंतर आता सीतारामन यांनी 5G संशोधनासाठी देशातील विविध इंजिनियरिंग कॉलेजमध्ये 100 लॅब तयार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

याद्वारे अनेक नवीन संधी, बिजनेस मॉडल्स आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासह 100 विविध लॅब्समध्ये विविध गोष्टींसह स्मार्ट क्लाल, सूक्ष्म कृषी, इंटेलिजेंस परिवहन प्रणाली आणि हेल्थकेअर एप्लीकेशन्सना कव्हर केलं जाणार आहे, यामुळे 5G सेवांचा वापर एक्सप्लोर केलं जाणार आहे. यामुळे अनेक गोष्टी सोप्प्या होणार आहे. यासाठी रिसर्च केला जाणार आहे.


Union Budget 2023 : 5G साठी रिसर्च लॅब; AI, DIGILocker संदर्भात अर्थमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -