घरपालघरवंदे भारतचे अपघात टाळण्यासाठी रेल्वेची नवी आयडियाची कल्पना

वंदे भारतचे अपघात टाळण्यासाठी रेल्वेची नवी आयडियाची कल्पना

Subscribe

या अपघातांमध्ये प्रवाशांना सुदैवाने कोणतीही ईजा झाली नसली तरी ट्रेनच्या पुढील भागाचे मात्र मोठे नुकसान झाले होते.त्याचबरोबर अपघातामुळे प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

सचिन पाटील,बोईसर: मुंबई -अहमदाबाद दरम्यान धावणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसला आता मेटल बीम कुंपणाचे संरक्षण लाभणार आहे.ही एक्सप्रेस सुरू झाल्यापासून पाळीव जनावरे रेल्वेमार्गात येऊन होत असलेल्या अपघातांची पश्चिम रेल्वेने गंभीर दखल घेतली असून आता रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कुंपण टाकण्यात येणार आहे. मुंबई-अहमदाबादपर्यंत पश्चिम रेल्वेच्या ६२२ किमी मार्गावर दोन्ही बाजूंनी मेटल बीमचे कुंपण घालण्यात येणार आहे.एकूण २४५.२६ कोटींच्या या कामाची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी केली असून मे २०२३ पर्यंत हे कुंपणाचे काम पूर्ण करण्यात येणार असून यासाठी निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान ३० सप्टेंबरपासून सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली आहे.मात्र सुरवातीपासूनच या ट्रेनला अपघातांचे ग्रहण लागले आहे.ही ट्रेन धावत असताना आतापर्यंत गुजरात राज्यात ट्रेनच्या मार्गात अचानक शेतकर्‍यांची गुरे आल्याने सात वेळा अपघात झाले आहेत.

या अपघातांमध्ये प्रवाशांना सुदैवाने कोणतीही ईजा झाली नसली तरी ट्रेनच्या पुढील भागाचे मात्र मोठे नुकसान झाले होते.त्याचबरोबर अपघातामुळे प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता.या सततच्या अपघातांची रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी गंभीर दखल घेत अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार मुंबई ते अहमदाबादपर्यंत रेल्वे मार्गाला दोन्ही बाजूंनी मेटल बीमचे कुंपण घालण्यात येणार असल्याने या मार्गावरील पाळीव जनावरांमुळे वंदे भारत एक्सप्रेस सोबतच इतर रेल्वे गाड्यांचे होणारे अपघात देखील टळण्याची आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -