घरताज्या घडामोडीइतका मोठा आर्थिक घोटाळा गेल्या 50 वर्षांत देशामध्ये घडला नव्हता - संजय राऊत

इतका मोठा आर्थिक घोटाळा गेल्या 50 वर्षांत देशामध्ये घडला नव्हता – संजय राऊत

Subscribe

'मागील पन्नास वर्षामध्ये इतका मोठा आर्थिक स्कॅम या देशात घडला नव्हता. ज्या घोटाळ्यामध्ये सत्ताधारी पक्षांचा थेट संबंध आहे', अशा शब्दांत संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर घाणाघात केला आहे.

‘मागील पन्नास वर्षामध्ये इतका मोठा आर्थिक स्कॅम या देशात घडला नव्हता. ज्या घोटाळ्यामध्ये सत्ताधारी पक्षांचा थेट संबंध आहे’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर घाणाघात केला आहे. आज सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी काल सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वरून सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. (Such a big financial scam has not happened in the country in the last 50 years says mp sanjay raut)

“आज विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे याच्या दालनात लोकसभा आणि राज्यसभेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. पुढील पावलं काय उचलायची यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मागील पन्नास वर्षामध्ये इतका मोठा आर्थिक स्कॅम या देशात घडला नव्हता. ज्या घोटाळ्यामध्ये सत्ताधारी पक्षांचा थेट संबंध आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय ज्याप्रकारे छापा टाकते, त्यामध्ये मनी लाँड्रींग आणि त्यांच्या असलेल्या बोगस कंपन्या दाखलवल्या जातात”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“सध्या उद्योगपतीचे एक प्रकरण समोर आले आहे. त्यामध्ये सिंगापूर, मॉरिशिअसमध्ये बोगस कंपन्या आहेत. मनी लाँड्रींग आहे. तरिही भाजपाच्या नेत्यांनी याच्याविरोधात आवाज का उठवला नाही. केंद्रीय तपास यंत्रणेने आतापर्यंत हालचाल का केलेली नाही? या तपास यंत्रणा केवळ विरोधी पक्षातील नेत्यांना तरुंगात टाकण्यासाठी निर्माण झाल्या आहेत का? अशी अनेक प्रश्न लोकांच्या मनात असून, या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी संसदेच्या दालनात आज वाचा फोडली जाणार आहे”, असेही राऊत म्हणाले.

भाजपाने देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे उद्ध्वस्त केली

- Advertisement -

“या बजेटमध्ये मुंबईच्या अनेक मागण्या होत्या. अनेक खासदारांनी केलेल्या मागण्या होत्या. पण आम्ही सातत्याने आवाज उठवूत राहू. देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपाने केलेले आहे. त्यामुळे शेअर बाजारावर देशाचे अर्थव्यवस्था ठरवण्याचे जे काम सुरू आहे, त्याचा सर्वसामान्यांशी काहीच संबंध नाही. पण सामान्य जनतेचे पैसे अत्यंत विश्वासाने भारतीय आयुर्विमा, LIC आणि स्टेट बँकेत जे नोकरदारांचे पैसे आहेत. त्याचा सरकारला हिशोब द्यावा लागेल”, असाही हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

पंतप्रधान मुंबईसाठी काय आणताहेत आणि काय देताहेत?

“पंतप्रधान एकाच महिन्यात दोनदा मुंबईत येत आहेत. पण येत असताना मुंबईसाठी काय आणताहेत आणि काय देताहेत? हा एक रहस्यमय असा विषय आहे. मुंबई महापालिका जिंकून शिवसेनेची सत्ता घालवून आणि भविष्यात ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून आणि महाराष्ट्राचे तुकडे करून जर कोणाला समाधान मिळणार असेल, तर ते शक्य नाही”, असा इशाराही यावेळी संजय राऊतांनी दिला.

आजवर हेच मुंबईचे दुर्दैव राहिले

“पंतप्रधानांनी मुंबईत यावे त्यांचे स्वागतच आहे. पण येताना मुंबईकरांसाठी काहीतरी घेऊन यावं. रिकाम्या हातानं येता आणि झोळी भरुन घेऊन जाता. आजवर हेच मुंबईचं दुर्दैव राहिलं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीचे बजेट; संजय राऊतांची टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -