घरमहाराष्ट्रसाहित्य संमेलनात रसिक म्हणून आलोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साहित्य संमेलनात रसिक म्हणून आलोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

साहित्यिकांच्या मेळाव्यात राजकारणी काय करणार?, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साहित्य संंमेलनात एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे साहित्य संमेलनात जमलेली गर्दी ही साहित्यावर प्रेम करणाऱ्यांची असते. राजकारण्यासांठी गर्दी, सभा याचे काही विशेष महत्त्व नसते. मात्र पंढरीची वारी वारकरी जसे करतात त्यानुसारच साहित्यावर प्रेम करणारे रसिक साहित्य संमेलनात येत असतात.

 

मुंबईः साहित्य संमेलनात रसिक म्हणून आलो आहे. या कार्यक्रमात पाहुणा म्हणून आलो आहे. सरकारचा या कार्यक्रमात कुठेही हस्तक्षेप राहणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

- Advertisement -

९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समाजाला दिशा देणारे आणि बळ देणारे साहित्यिक हे सामाजिक नेतेच असतात. सामाजिक तळमळीतून साहित्याची निर्मिती होत असते. दुसऱ्याचं दुःख आपलं समजून साहित्यिक काम करत असतात. अशा साहित्यिकांच्या मेळाव्यात राजकारणी काय करणार?, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साहित्य संंमेलनात एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे साहित्य संमेलनात जमलेली गर्दी ही साहित्यावर प्रेम करणाऱ्यांची असते. राजकारण्यासांठी गर्दी, सभा याचे काही विशेष महत्त्व नसते. मात्र पंढरीची वारी वारकरी जसे करतात त्यानुसारच साहित्यावर प्रेम करणारे रसिक साहित्य संमेलनात येत असतात.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठी भाषेसाठी साहित्यिकांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. मराठी भाषा म्हणजे चमत्कार घडवणारी भाषा आहे. त्यामुळेच या कार्यक्रमात एक रसिक म्हणूनच मी आलो आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी दावोसला गेलो तेव्हा मला तेथे मराठी उद्योजक भेटले. मला तेथे मराठी ऐकून समाधान वाटले. तेथे भेटलेल्या मराठी उद्योजकांचे म्हणणे होते की, संमेलनासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र आलो पाहिजे. मराठी माणसाविषयी असलेली आपुलकी अशाच कार्यक्रमातून वाढत असते, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

शहराकडून खेड्याकडे चला असा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांचे वास्तव्य वर्धा येथे होते. अशा या भूमिला मी वंदन करतो. साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा बहुमान मिळेल, असे मला कधी वाटले नाही. पण कृतज्ञ भावनेने मी येथे उभा आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आजपासून तीन दिवस हे संमेलन होणार आहे. साहित्याचा जागर येथे होईल. त्यामुळे ही साहित्याची पंढरीच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -