घरदेश-विदेशनेपाळमध्ये स्कूल बस दरीत कोसळली; १६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

नेपाळमध्ये स्कूल बस दरीत कोसळली; १६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Subscribe

स्कूलबस घोरहीमध्ये असणाऱ्या कृष्णासेन इचचुक टेक्निकल स्कूलची असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व विद्यार्थी मुलपानीच्या कलकुरॉटच्या वनस्पती उद्यानाला भेटण्यासाठी गेले होते.

नेपाळमध्ये स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर ११ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. नेपाळच्या डांग जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तुलसीपूर – कपुरकोट रोडवर बस दरीमध्ये कोसळली. या बसमधून शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. हे सर्व जण टूरसाठी गेले असता ही घटना घडली आहे. एका वनस्पती उद्यानाला भेट देऊन त्याठिकाणावरुन परतत असताना बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तुसलीपूरचे डीएसपी प्रेम बहादूर शाही यांनी सांगितले आहे की, या बसमधून ३२ विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. ही स्कूलबस घोरहीमध्ये असणाऱ्या कृष्णासेन इचचुक टेक्निकल स्कूलची असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व विद्यार्थी मुलपानीच्या कलकुरॉटच्या वनस्पती उद्यानाला भेटण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरुन परत येत असताना बसला अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

जगातील सर्वात मोठ्या घुमटाला नेपाळच्या शिष्टमंडळाने दिली भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -